TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IBPS RRB Admit Card 2021: ग्रामीण बँक पीओ परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर, असे करा डाऊनलोड Rojgar News

Admit Card 2021: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने आपली अधिकृत वेबसाइट ibps.in वर प्रादेशिक ग्रामीण बॅंक (आरआरबी) अधिकृत स्केल १ पदभरती परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. ही परीक्षा १ ऑगस्ट चे ७ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाणार आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता ते IBPSची अधिकृत वेबसाइट ibps.inवर जाऊन आपले ई-कॉल लेटर डाऊनलोड करु शकतात. IBPS RRB परीक्षेसंदर्भात महत्वाच्या बाबी IBPS RRB प्रीलिम्स परीक्षा १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. अधिकारी स्केल I साठी ४७१६ पदांवर भरती आहे. IBPS RRB PO प्रीलिम्स परीक्षेसाठी ४५ मिनिटाचा वेळ दिला जाईल. परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ टाइप बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. IBPS RRB PO परीक्षा एकूण ८० गुणांची असेल. यामध्ये रिजनिंगचे ४० गुण आणि क्वांटिटेटीव्ह अॅप्टिट्यूड सेक्शनचे ४० प्रश्न विचारले जातील. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. IBPS RRB Admit Card 2021: असे डाऊनलोड करा प्रवेशपत्र प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याआधी अधिकृत वेबसाइट ibps.in वर जा. वेबसाइटच्या होमपेजवर IBPS Rural Regional Bank RRB X Recruitment 2021 वर क्लिक करा. आता Common Recruitment Process for RRBs (CRP-RRBs-X) for Recruitment of Group “A” – Officers (Scale-I) या लिंकवर क्लिक करा. मागितलेले डिटेल्स भरा लॉगिन केल्यावर प्रवेश पत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि प्रिंट घेऊन ठेवा. आयबीपीएस आरबीबी स्केल I परीक्षेच्या माध्यमातून ४ हजार ७१६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. IBPS RRB Admit Card 2021: पगार अधिकृत नोटिफिकेशननुसार, अधिकारी स्केल- I अंतर्गत नवीन भरतीसाठी ३० हजार ते ३५ हजार रुपये पगार आणि अतिरिक्त भत्ता देण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UXdjHw
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या