Advertisement

ICSE and ISC syllabus 2022: काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (Council for The Indian School Certificate Examinations, CISCE) ने शैक्षणिक सत्र २०२० साठी ICSE आणि ISC परीक्षांचा म्हणजेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. ने दहावी आणि बारावीच्या विविध विषयांसाठी अभ्यासक्रमात कपात केली आहे. जे विद्यार्थी यंदा दहावी किंवा बारावीची परीक्षा देणार आहेत, त्यांनी अधिकृत वेबसाइट वर विस्तृत नोटिफिकेशन पाहावे. काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सद्वारे जारी नोटिफिकेशननुसार, ICSE साठी इतिहास आणि नागरिक शास्त्र, भूगोल, गणित, भौतिक, रसायन शास्त्र, जीव शास्त्र, अर्थशास्त्र, वाणिज्यिक अध्ययन, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, इकॉनॉमिक अॅप्लिकेशन, फायनान्शिअल अॅप्लिकेशन, एन्व्हॉयर्नमेंट अॅप्लिकेशन, होमसायन्स, शारीरिक शिक्षण, योग यासह अन्य विषयांचा अभ्यासक्रम कमी केला आहे. म्हणजेच ISC च्या अकाउंट्स, कॉमर्स, इकोनॉमिक्स, बिजनेस स्टडीज, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, जॉग्रफी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, बायोटेक्नोलॉजी, एन्व्हॉयर्नमेंल सायन्स या विषयांच्या अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे. आयसीएसई बोर्डाने यासंबंधी सर्व संलग्न शाळांच्या प्रमुखांना पत्र लिहिलंय की २०२२ च्या परीक्षांसाठी आयसीएसई आणि आयएससीच्या अन्य विषयांचा अभ्यासक्रमाचा आढावा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. परिषद लवकरच उर्वरित विषयांच्या अभ्यासक्रम कपातीचीदेखील घोषणा करेल. काऊन्सिलने शाळांना अभ्यासक्रमात दिलेल्या क्रमानुसार विषय शिकवण्याच्या सूचना केल्या आहेत. आयसीएसई परीक्षांसंबंधीच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wuAWo3
via nmkadda