Advertisement

Central Railway Bhusawal Recruitment2021: भारतीय रेल्वेच्या मध्य () विभागात विविध पदांवर भरती निघाली आहे. याअंतर्ग विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी १५ जुलैपर्यंत अर्ज करायचे आहेत. उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीअंतर्गत जीडीएमओ डॉक्टर, इंटेंसिव्हिस्ट आणि फिजिशियन पदांच्या एकूण १३ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवाराच्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि पगार असणार आहे. डॉक्टर पदाच्या ८ जागा भरण्यात येणार आहे. इंटेंसिव्हिस्ट पदाच्या ३ जागा भरल्या जाणार आहेत. तर फिजिशियन पदाच्या २ जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. राखीव वर्गातील उमेदवारांना वयातून सवलत मिळणार आहे. रेल्वेतर्फे हे कॉंट्रॅक्ट कधीही रद्द केले जाऊ शकते. कॉंट्रॅक्ट संपण्याच्याआधी कोणतेही कारण न देता १५ दिवसांची नोटीस देण्यात येईल. ही पदभरती कायमस्वरुपी ठेवण्याबाबत रेल्वे कोणतीही जबाबदारी घेत नाही. एससी/एसटी/ओबीसी या राखीव गटातील उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. डॉक्टर पदासाठी ७५ हजार दर महिना वेतन दिले जाईल. स्पेशलिस्ट डॉक्टर पदासाठी ९५ हजार दर महिना वेतन दिले जाईल. मूळ जाहिरातीत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांना दिनांक १५ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील. इच्छुक उमेदवारांनी srdpobsl@gmail.com या ईमेल आयडीवर अर्ज पाठवायचा आहे. त्यानंतर २० जुलैला व्हॉट्सअॅप रेकॉर्डेड कॉन्फरन्स कॉल(दिलेल्या फॉर्मेटनुसार) होईल. डॉक्टर पदासाठी CMP Doctors-7219811500 या नंबरवरुन व्हॉट्सअॅप कॉन्फरन्स कॉलद्वारे मुलाखत होईल. उमेदवाराच्या भरतीवेळी त्याने दिलेल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल. अर्जदारांनी दिलेल्या नमुन्यामध्ये कागदपत्रांची स्कॅन कॉपी ईमेलवर पाठवायची आहे. यानंतर पात्र उमेदवारांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. जाहिरातीमध्ये संपूर्ण नमुना देण्यात आला आहे. बातमीखाली जाहिरात देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AOcmC8
via nmkadda