TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

SSC Delhi Police SI CAPF ASI परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

Exam : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ने दिल्ली पोलीस सीएपीएफ एसआय आणि सीआयएसएफमध्ये एएसआय भरती 2019 प्रक्रियेतील पेपर-2 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी करायला सुरुवात केली आहे. एकेका प्रादेशिक विभागातील अॅडमिट कार्ड टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहेत. एसएससीच्या काहील प्रादेशिक विभागातील अॅडमिट कार्ड वेबसाइटवर अपलोड करायचे बाकी आहे. लवकरच आयोगाकडून हे अॅडमिड कार्डही उपलब्ध करून दिले जातील. एसएससीच्या नव्या वेळापत्रकानुसार, दिल्ली पोलीस सीएपीएफ एसआय आणि सीआयएसएफमध्ये एएसआय भरती 2019 पेपर-2 चे आयोजन २६ जुलै रोजी होणार आहे. यापूर्वी ही पेपर-2 परीक्षा १२ जुलै रोजी होणार होती. पण कोविड-१९ महामारी संसर्गामुळे ती २६ जुलै २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली. जे उमेदवार PST/PET चाचणीत पात्र ठरले, त्यांना पेपर-२ परीक्षा देता येणार आहे. परीक्षेचे स्वरुप कसे असेल? SSC DP SI, CAPF ASI Paper-II इंग्रजी लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन विषयाचा असेल. २०० गुणांच्या या पेपरसाठी २०० प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी दोन तासांचा राहील. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन असेल. प्रत्येक चुकीच्या पर्यायासाठी ०.२५ गुण वजा होतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T74gU8
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या