Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ५ जुलै, २०२१, जुलै ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-05T05:47:04Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ITI Admisson 2021: आयटीआयचे प्रवेश दहावीच्या गुणांवर Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश सत्र २०२१ साठीचे प्रवेश ( Admisson 2021) सुरू होणार आहेत. दहावीच्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रणालीतून हे करण्यात येणार आहेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे () संचालक डी. ए. दळवी यांनी दिली. राज्यातील ३५८ तालुक्यांत ४१७ शासकीय आयटीआय कार्यरत असून, सुमारे एक लाख जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुला-मुलींसाठी ०४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्यांकांसाठी स्वतंत्र ०२ संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५ तर २८ आदिवासी आश्रमशाळा संस्थांचा समावेश आहे. तर ५३८ खासगी आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता सुमारे ५० हजार आहेत. सर्व प्रवेश हे ऑनलाइनच होणार आहेत. प्रवेशासंबंधी नियम, आवश्यक कागदपत्रांची माहिती व प्रवेश कार्यपद्धती पुस्तिका लवकरच संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी https://ift.tt/2BH1dcn वर या वेबसाइटवर संपर्क करावा असे सांगण्यात आले आहे. राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेण्याबाबत कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने आवाहन केले आहे. तसेच प्रवेशाचे वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सध्या आयटीआयमध्ये ९१ विविध ट्रेडमध्ये शिक्षण दिले जात आहे. या व्यवसायांचा अभ्यासक्रम हा उद्योगांशी संबंधित आहे. तसेच तो उद्योगातील तज्ज्ञांनीच विकसित केला आहे. या अभ्यासक्रमातील प्रशिक्षण कालावधीत कारखान्यांना भेटी देणे, उद्योगधंद्यातील तज्ज्ञांचे व्याख्यान, कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केले जात असल्याचेही दळवी यांनी सांगितले. सध्या शिकविण्यात येत असलेल्या एकूण ९१ शाखांपैकी ८० शाखांचे प्रवेश दहावीच्या गुणांवर तर ११ व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण अशी शैक्षणिक आर्हता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AtsybG
via nmkadda