Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ५ जुलै, २०२१, जुलै ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-05T06:47:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

इंग्रजी शाळांची २५ टक्के शुल्ककपात Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकांचे रोजगार गेले आहेत, वेतनकपात झाली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या अनेक पालकांना शुल्क भरणे शक्य झाले नाही. यामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अखेर पालकांची अडचण व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या संघटनेने शालेय शुल्कामध्ये २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत करण्यात येणार आहे. अनेक पालकांनी शाळेचे शुल्क न भरल्यामुळे संस्थाचालकांना शाळा चालविणे अवघड झाले आहे. तर दुसरीकडे सध्या ऑनलाइन वर्ग सुरू असल्याने ज्या सुविधांचा वापर होत नाही त्या सुविधांचे शुल्क आकारू नये, अशी मागणी पालक करत होते. यातच सर्वोच्च न्यायालयाने १५ टक्के शुल्क कपात करण्याबाबत सूचित केले होते. या सगळ्याचा विचार करून 'मेस्टा'ने त्यांच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत २५ टक्के शुल्ककपातीचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा राज्यातील १८ हजार शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी करोनाकाळात दोन्ही पालक गमावले, अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णयही संघटनेने घेतला आहे. मात्र हा निर्णय घेतानाही शाळांनी आपल्या अडचणी मांडल्या आहेत. 'करोनामुळे पालकांना अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे ते आम्ही डोळ्याने पाहतो. मात्र शाळा व्यवस्थापनाच्याही अनेक अडचणी आहेत. वीजबिल आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे बँका इमारती जप्त करत आहेत. याचीही अडचण लक्षात घेण्याची गरज आहे. ज्या पालकांचे उद्योग, व्यवसाय सुरळीत आहेत, जे सरकारी अथवा निमसरकारी नोकरीला आहेत, त्यांचा पगार होत आहेत, त्या पालकांनी शाळाशुल्क भरायला हवे. मात्र ते पालकही शुल्क देत नसल्याने शाळांना व्यवस्थापन करणे अवघड होत आहे', असे 'मेस्टा'चे अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी सांगितले. सरकारने एकतर्फी भूमिका घेणे थांबवावे. पालक आणि शाळा, संस्थाचालक यांच्याबरोबर बैठका घेऊन सर्वसमावेशक तोडगा काढावा. सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र तरीही चर्चा न झाल्यास राज्यातील सर्व इंग्रजी शाळा बेमुदत बंद करण्याची हाक द्यावी लागेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाला पालक व सरकारच जबाबदार राहतील, याची सरकारने नोंद घ्यावी. - संजयराव तायडे पाटील, संस्थापक अध्यक्ष, मेस्टा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jJtzGI
via nmkadda