Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १६ जुलै, २०२१, जुलै १६, २०२१ WIB
Last Updated 2021-07-16T06:47:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Main 2021: पुन्हा बदलली परीक्षेची तारीख, नवे वेळापत्रक पाहा Rojgar News

Advertisement
JEE Main Exam 2021 Latest Update: इंजिनीअरिंग यूजी कोर्सच्या प्रवेशासाठी होणारी प्रवेश परीक्षा जेईई मेन संदर्भात महत्वाची बातमी आहे. जेईई मेन २०२१ चे चौथे सत्र (JEE Main 4th session 2021) म्हणजे जेईई मेन मे २०२१ संदर्भात ही माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवरुन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ने जेईई मेन सेशन ४ च्या तारखांमध्ये पुन्हा बदल केला आहे. जेईई मेनच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षेमध्ये किमान ४ आठवड्याचे अंतर असावे अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. यासाठी ही परीक्षा आता २६,२७,३१ ऑगस्ट २०२१ आणि २ सप्टेंबर २०२१ ला होणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान ()यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली. जेईई मेन सेशन ४ साठी आतापर्यंत ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेची तारीख बदलण्यासोबतच जेईई मेन सेशन ४ नोंदणीची शेवटची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. आता विद्यार्थी २० जुलै २०२१ पर्यंत jeemain.nta.nic.in वर नोंदणी करु शकतात. एनटीए जेईई मेन एप्रिल २०२१ (JEE Main April 2021) जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी (JEE Main 3rd session) प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा २० जुलैला सुरु होणार आहे. २०,२२, २५ आणि २७ जुलै २०२१ ला देशविदेशातील ३३४ शहरांमध्ये ऑनलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rf9Znx
via nmkadda