Advertisement

SSC Result2021: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल (Class x Result) नुकताच जाहीर करण्यात आला आहे. एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात (Maharashtra Board) प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला. गेल्यावर्षी दहावीच्या परीक्षेत तब्बल २४२ विद्यार्थ्यांनी चक्क सेंच्युरी मारली होती. २४२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण म्हणजेच १०० टक्के मिळाले होते. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ८३,२६३ होती. त्यामुळे यंदाच्या निकालात काय होणार? हे पाहणं महत्वाचं होतं. यंदा विद्यार्थ्यंचा रिझल्ट पाहता गुणांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांची पास होण्याची सरासरी देखील मोठी आहे. एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी दहावी निकाल २०२१ दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. कुठे पाहाल निकाल? https://ift.tt/2U7pMIW या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U8avHP
via nmkadda