Advertisement

NEET 2021: परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी फॉर्म निघाले असून विद्यार्थी मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)ची अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर अर्ज करु शकतात. ६ ऑगस्ट रात्री ११.५० वाजेपर्यंत हे अर्ज स्वीकारले जातील. विद्यार्थ्यांना नीट २०२१ चे परीक्षा शुल्क ७ ऑगस्ट रात्री ११.५० वाजेपर्यंत भरता येणार आहे. एनटीए ८ ते १२ ऑगस्टपर्यंत विंडो खुली ठेवणार आहे. तर प्रवेश पत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी जाहीर केले जाणार आहे. कशी असेल ? नीट २०२१ पेन आणि पेपरच्या माध्यमातून होणार आहे. उमेदवारांना बॉल पॉइंट पेनचा उपयोग करुन योग्य उत्तरावर गोल करायचे आहे. परीक्षा पॅटर्न एमसीक्यू फॉर्मेटमध्ये असेल. प्रत्येक योग्य उत्तरासाठी उमेदवाराला चार गुण मिळतील. तर चुकीच्या उत्तरासाठी एक गुण कापला जाईल. आवडीचे शहर निवडा ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार चार परीक्षा शहर निवडता येणार आहेत. उमेदवार जिथे राहतो ते शहर किंवा त्याच्या शेजारच्या शहराची निवड करु शकतो. उमेदवारांना शहराची निवड योग्यपद्धतीने काळजीपूर्वक करायला हवी. कारण त्यानंतर परीक्षा शहर बदलण्याचा पर्याय नसेल. परीक्षांच्या तारखा जाहीर करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर NEET UG 2021 ही परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. १३ जुलैपासून एनटीएच्या वेबसाइटवर अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मागील वर्षी कोविड -१९ महामारी आणि लॉकडाऊनमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. अनेकदा लांबणीवर पडल्यानंतर अखेर सप्टेंबर २०२० मध्ये नीट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. यासोबतच मेडिकलच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी (Medical PG admission) घेतली जाणारी प्रवेश परीक्षा नीट पीजी (NEET PG)च्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षा २०२१ (NEET PG 2021)चे आयोजन ११ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. सुरक्षेची काळजी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर मास्क देण्यात येणार आहे. परीक्षार्थींची नोंदणी, एन्ट्री आणि एक्झिट यावेळी जवळून संपर्क होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. सॅनिटायझेशन, बसण्याच्या व्यवस्थेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर यासंदर्भातील माहिती मिळू शकणार आहे. बातमीखाली याची लिंक देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wBwd3T
via nmkadda