Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १५ जुलै, २०२१, जुलै १५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-15T05:47:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Direct Second Year Engineering Admission: सेकंड इयर डिप्लोमाच्या प्रवेशांना सुरुवात Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखांच्या पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांसाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवण्याच्या प्रक्रियेला मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे ही प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, चार ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. या प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक असून, त्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पडताळणीची मुभा देण्यात आली आहे. https://ift.tt/3yWoAGU या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गणित, रसायन शास्त्र, भौतिकशास्त्र, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जीवशास्त्र, इन्फोर्मेटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल विषय, अॅग्रीकल्चर यापैकी कोणत्याही तीन विषयांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. शिवाय 'आयटीआय'मधून दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थीही या प्रवेशांसाठी पात्र असणार आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन कागदपत्रे पडताळणीची संधी दिली जाणार असून यापैकी कोणतीही एक प्रक्रिया ऑनलाइन अर्ज करताना निवडण्याचा पर्याय असणार आहे. प्रत्यक्ष कागदपत्रे पडताळणीचा पर्याय निवडल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या केंद्रांवर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करता येईल. या केंद्रांची यादी https://ift.tt/3ppVBHO या वेबसाइटवर देण्यात आली आहे. ऑनलाइन पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे 'स्कॅन' करून अपलोड करणे बंधनकारक असणार आहे. ही सर्व प्रक्रिया ४ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. अर्जाची मुदत संपल्यानंतर ७ ऑगस्टला तात्पुरत्या स्वरुपाची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, १२ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. प्रवेशासाठी आसन क्रमांक आवश्यक जे विद्यार्थी २०२१मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षांना बसले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप लागलेला नाही. ४ ऑगस्टपर्यंत तो निकाल लागेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाबाबत अडथळे येऊ नये म्हणून पदविका प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज करताना शैक्षणिक पात्रतेच्या कॉलममध्ये बारावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक नमूद करणे आवश्यक असणार आहे. डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया १. थेट दुसऱ्या वर्षात अभियांत्रिकी व तंत्रज्ञानातील विद्याशाखांच्या पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार. २. चार ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणे शक्य. ३. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक असून बारावीचा आसन क्रमांक देणे आवश्यक. ४. विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन, असे दोन पर्याय. ५. सात ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार. ६. १२ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hCZXJB
via nmkadda