Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २३ जुलै, २०२१, जुलै २३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-23T07:43:38Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET UG 2021: नीट परीक्षेसाठी आता दुबईतही केंद्र, नोंदणी प्रक्रिया ६ ऑगस्टपर्यंत Rojgar News

Advertisement
NEET 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत वैद्यकीय आणि दंत पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा () आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १३ जुलै पासून सुरू आहे. ही नोंदणी प्रक्रिया ६ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान एनटीएने मध्य-पूर्व आशियाई देशांच्या उमेदवारांसाठी देखील परीक्षा केंद्राची घोषणा केली. मध्य-पूर्व आशियाई देशांच्या उमेदवारांसाठी यूजी २०२१ प्रवेश परीक्षेच्या सुविधेसाठी कुवेतसह दुबईत देखील परीक्षा केंद्र असणार आहे. गुरुवारी २२ जुलै रोजी एनटीएने यासंदर्भात परिपक्षक जारी केलं. यानुसार उमेदवार ६ ऑगस्ट रात्री ११.५० वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. आधीच्या अर्जांमधील दुरुस्तीसाठी ८ ते १२ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दुसरीकडे, ज्या उमेदवारांनी नीट यूजी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा अर्ज केले होते, त्या उमेदवारांना देखील एनटीएने दुबई हे परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा दिली आहे. हे उमेदवार ८ ते १२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत अॅप्लिकेशन करेक्शन विंडोमार्फत परीक्षा केंद्राचं शहर बदलू शकतात. ntaneet.nic.in वर करा रजिस्ट्रेशन नीट यूजी 2021 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइट, ntaneet.nic.in वर पूर्ण करता येईल. अर्ज प्रक्रियेंतर्गत उमेदवारांनी वेबसाइटला भेट दिल्यानंतर होम पेज वर दिलेल्या ‘फिल रजिस्ट्रेशन फॉर्म’ लिंक वर किंवा या वृत्तात दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करून अॅप्लिकेशन पेज वर जावं लागेल. या पेज वर उमेदवारांना सर्वात आधी‘न्यू रजिस्ट्रेशन’ लिंक वर क्लिक करून नोंदणी करावी लागेल आणि नंतर अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करून उमेदवार आपले अॅप्लिकेशन सबमिट करू शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BwQGKR
via nmkadda