Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ९ जुलै, २०२१, जुलै ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-07-09T12:47:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NO Vaccine No Job: वॅक्सिन नसेल तर 'या' देशामध्ये नोकरी नाही! Rojgar News

Advertisement
NO No Job: फिजी देशामध्ये करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. देशाला करोनामुक्त करण्यासाठी काही योजना आखण्यात आले आहेत. फिजी देशाचे फ्रेंक बेनीमरामा यांनी याबद्दल माहिती दिली. देशातील कोणत्या नागरिकांने घेतली नसेल तर त्याला नोकरी देखील मिळणार नाही. पंतप्रधान फ्रॅंक यांनी सर्व नोकरदार वर्गाला यासंदर्भात सूचना दिली. प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीसाठी करोना वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. डेल्टा वेरिएंट दार ठोठावत जगभरात भीती पसरली असल्याने ही सूचना महत्वाची आहे. नो वॅक्सिन, नो जॉब असा स्पष्ट संदेश पंतप्रधआन फ्रॅंक यांनी दिला आहे. यासोबतच फिजीच्या पंतप्रधानांनी देशातील ९ लाख ३० हजार सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठविले आहे. सर्वांनी सुट्टीवर जा आणि वॅक्सिन घ्या. जर १५ ऑगस्टपर्यंत कोणी वॅक्सिन घेतले नाही तर त्याला नोकरीवरुन काढण्यात येईल असे पंतप्रधान फ्रॅंक यांनी सांगितले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबरपर्यंत वॅक्सिनचा दुसरा डोस घेणे अनिवाार्य करण्यात आले आहे. पंतप्रधान फ्रॅंक यांनी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना ही सूचना दिली नाही. तर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना देखील त्यांनी निर्देश दिले आहेत. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गाने १ ऑगस्टपर्यंत करोना लसीचा पहिला डोस घेणे गरजेचे आहे. यात कोणी निष्काळजीपणा करत असेल आणि कंपनी बंद करण्याची धमकी दत असेल तर त्यांना दंड ठोठावण्यात येईल असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी देशाला दिलेल्या संबोधनात म्हटले की, विज्ञान आम्हाला सांगते की आधी सुरक्षित व्हा. आता सरकारने देखील हे धोरण आखले आहे. याला कायद्याच्या स्वरुपात आणले जात आहे. मी माझ्या पत्नीसोबत करोनाची लस घेतली आहे. कारण मला माझ्या परिवाराची काळजी असल्याचे देखील पंतप्रधान फ्रॅंक म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hUJmj9
via nmkadda