Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २१ जुलै, २०२१, जुलै २१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-21T08:45:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

RBI Recruitment2021: आरबीआयमध्ये भरती, ३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज Rojgar News

Advertisement
RBI Recruitment2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) आस्थापनेत विविध पदांवर भरती आहे. याअंतर्गत वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येत आहे. आरबीआयतर्फे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी मिळणारा पगार, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या आस्थापनेवरील वैद्यकीय सल्लागार पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदाराकडे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असणे गरजेचे आहे. अर्जदाराला कोणत्याही रुग्णालयात किंवा क्लिनिकमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिशनर म्हणून औषधोपचार करण्याचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा. त्याचे स्वतःचे क्लिनिक / दवाखाना किंवा राहण्याची जागा बँकेच्या कोणत्याही दवाखान्याच्या १० ते १५ कि.मी.च्या अंतरात असावी. वैद्यकीय सल्लागाराचे मानधन हे प्रत्यक्ष कामाच्या तासांवर ठरेल. वैद्यकीय सल्लागार पदाचा कालावधी हा तीन वर्षांसाठी असेल. करार पूर्ण झाल्यावर कोणतीही नूतनीकरण होणार नाही. अर्जदाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून त्यातील पात्रता, निकष समजून घेऊन अर्ज भरावा. ओबीसी, एससी, एसटी उमेदवारांनी दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरताना सोबत कास्ट सर्टिफिकेटची प्रत जोडणे आवश्यक आहे. आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांनी देखील संबंधित कागदपत्र अर्जासोबत जोडावी. दिलेल्या नमुन्यात अर्ज नसल्यास तो रद्द करण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख आरबीआयतर्फे जाहीर करण्यात आलेल्या नमुन्यात अर्ज भरुन पाठवायचा आहे. उमेदवारांनी दिनांक ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत. यानंतर आलेल्य अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज करण्यासाठी पत्ता इच्छुक आणि पात्र उमेदवार प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, , मुख्य कार्यालय इमारत, डॉ. राघवेंद्र राव रोड, सिव्हिल लाईन्स, पोस्ट बॉक्स नं- १५, नागपूर, पिनकोड- ४४०००१ या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36S1EwG
via nmkadda