Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ५ जुलै, २०२१, जुलै ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-05T11:47:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शिक्षकाने स्वतः कल्पकतेने रंगविली शाळा... Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद करोनाचा प्रादुर्भाव आणि सरकारकडून न मिळणारा पुरेसा निधी या परिस्थितीतही विद्यार्थ्यांना शाळा आपलीशी वाटावी, यासाठी मुख्याध्यापक शिक्षकानेच कंबर कसली. त्यांनी थेट हातामध्येच ब्रश घेत कल्पकतेने शाळा रंगवली. शाळेच्या भींवर चित्रे रंगवत, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल, अशी काळजी घेतली. गंगापूर तालुक्यातील दिनवाडा, जुना प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विकास बोचरे असे या शिक्षकाचे नाव असून, या उपक्रमशील शिक्षकाचे परिसरात कौतुक होत आहे. जिल्हा परिषद शाळांना शासनाकडून दर वर्षी देण्यात येणारे देखभाल अनुदान अगदीच नगण्य असते. या अनुदानात जेमतेम टपाली खर्च निघू शकेल, अशी परिस्थिती असते. त्यातच शाळेचीही रंगरंगोटी करून घ्यायची म्हटल्यास मोठी तारेवरची कसरत असते. अशा परिस्थितीचा विचार करत बोचरे यांनी स्वत:च शाळा रंगविण्याचे काम केले. दिनवाडा (जुना) प्राथमिक शाळा ही द्विशिक्षकी शाळा असून प्रभारी मुख्याध्यापक पदाचा पदभार बोचरे यांच्याकडेच आहे. शाळेच्या रंगरंगोटीसाठी काही रंगकाम कारागिरांकडून खर्चाची चौकशी केली असता ३५ हजार रुपये खर्च सांगितला गेला. शाळेकडे तेवढा निधी नसल्याने कारागीरांकडे पुढील चर्चा न करता बोचरे यांनी थेट हातामध्ये ब्रश घेण्याचे ठरवले. ब्रश, स्प्रे पेंटिंग मशीन हाती घेऊन शाळा रंगविण्याचे काम हाती घेतले. गावकऱ्यांनीही कलरसाठी मदत केली अन् पाच दिवसांत पूर्ण शाळेचे रंगकाम पूर्ण केले अन् शाळा पुन्हा 'बोलकी' झाली. त्यामुळे शिक्षकांसह ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला. शिक्षकाने दाखविलेल्या या हिमतीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. अन् भींती बोलू लागल्या.. करोनामुळे १६ मार्च २०२०पासून शाळा बंद आहेत. प्रत्यक्ष वर्ग नाही, त्यात अनेक वर्षापूर्वी दिलेला कलर यामुळे शाळेच्या भिंती रंग उडालेला. शाळा सुरू करण्याबाबत चर्चा होते आहे, अशावेळी विद्यार्थी आला तर त्याला शाळा आपलीसी वाटली पाहिजे, या हेतूने बोचरे यांनी शाळा स्वत:च रंगविण्याचा निर्णय घेतला. सद्यस्थितीत शाळा प्रत्यक्ष बंद असल्याने शाळेत फावला वेळही भरपूर मिळत असल्याने त्याचा पुरेपूर वापर करून अत्यंत आकर्षक रंगरंगोटी केली. तीन वर्गखोल्या, एक ऑफिस, एक किचन शेड अशा १६ भिंती रंगविण्याचे काम त्यासह अभ्यासक्रमाशी निगडित चित्रे काढण्याचे काम करण्यात आले. सुंदर माझी शाळा शाळांसाठी सुंदर माझी शाळा उपक्रम राबवण्याचे ठरवले त्याअंतर्गत शाळेचे अंतर्बाह्य सुशोभीकरण, कार्यालय व्यवस्थापन, स्वच्छता, भौतिक सुविधा अशा अनेक बाबी होत्या. परंतु निधीची कमतरता मोठी असते त्यामुळे शाळांसमोरही अडचणी आहेत. २०१५पूर्वी शाळा अनुदान, देखभाल दुरुस्ती व अनुदान अशा तीन हेडखाली सुमारे अकरा हजार रुपयांचा निधी मिळायचा. मात्र, त्यानंतर समग्र शिक्षा अभियानात तीन हेड एकत्र करण्यात आले अन् रक्कमही कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. बाह्यरंग उडाल्यामुळे शाळा निस्तेज दिसत होती तुटपुंज्या निधीमध्ये संपूर्ण शाळेला रंग देने शक्य नव्हते मग स्वतःच रंगकाम करायचे ठरवले. कुठेतरी अंतर्गत मनात असे वाटत होते की आपल्याला हे जमेल आणि करून पाहिल्यानंतर ते त्यापेक्षाही सुंदर झाले. विकास बोचरे, शिक्षक, प्रभारी मुख्याध्यापक..., दिनवाडा (जुना) प्राथमिक शाळा


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TsMYRz
via nmkadda