Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २४ जुलै, २०२१, जुलै २४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-24T13:43:32Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

करिअरमधील 'मिक्स अँड मॅच' Rojgar News

Advertisement
सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर एका विषयात पदवी शिक्षण घेतलेले दुसऱ्याच क्षेत्रात कार्यरत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. जसे की, बीए (इतिहास), कम्प्युटर कोर्स केलेले एखाद्या कंपनीच्या एचआर विभागात कार्यरत आहेत किंवा प्राणीशास्त्रातील बीएससी पदवी आणि एखाद्या कंपनीच्या विपणन विभागात काम करतात. सध्या 'मिस अँड मॅच'चा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण या सगळ्यात एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे आपले दुर्लक्ष होते आहे, तो म्हणजे नोकरीच्या क्षेत्राशी पूर्णपणे किंवा अंशतः संबंधित कोर्सचा अभ्यास करण्यास काय हरकत आहे? लक्षात घ्या, इथे मी जॉब-ओरिन्टेड कोर्सबाबत बोलत नसून अशा 'इंटर-रिलेटेड' किंवा 'कॉम्बिनेशन' कोर्सेसबाबत बोलत आहे. यामुळे स्पर्धात्मक काळात दुसऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यास मदत होईल. असे हे 'इंटर-रिलेटेड' किंवा 'कॉम्बिनेशन' कोर्स करण्याचे विविध फायदे समजून घेऊ या... ० स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी... केवळ पदवीवर उत्तम नोकरी मिळवण्याचा काळ राहिलेला नाही. लक्षात घ्या, सध्याची वाढती लोकसंख्या बघता आणि स्वतःचे वर्चस्व, अस्तित्व टिकवण्यासाठी बऱ्याच कंपन्यांनी हायर अँड फायर या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. अशा परिस्थितीत एकाच क्षेत्रात पारंगत असलेल्या व्यक्तींपेक्षा बहु-प्रतिभावान व्यक्ती टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे. उदाहरणार्थ, सध्या कम्प्युटरचे ज्ञान हे अतिरिक्त शैक्षणिक पात्रता म्हणून पाहिले जात नाही. पण कोणत्याही उद्योगात ती आवश्यक पात्रता आहे. - कामाशी संबंधित नसलेल्या विषयाचा अभ्यास करण्यापेक्षा इंटर-रिलेटेड विषय/कोर्स नेहमीच फायदेशीर ठरतो. - आधी नमूद केल्याप्रमाणे घेतलेले शिक्षण आणि त्या शिक्षणाचा संबंध नसलेल्या क्षेत्रात काम करण्यापेक्षा इंटर-रिलेटेड कोर्स हे यशस्वी कारकीर्द बनवण्याचा मार्ग नक्कीच सोपा करतात. - एका विषयातील ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या विषयाच्या पायाबांधणीसाठी होतो. इंटर-रिलेटेड कोर्सचा अजून एक फायदा म्हणजे एका विषयातील ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या विषयात करता येतो. जसे की, भाषेवरील प्रभुत्व (उदारणार्थ, मराठी भाषा) आणि पत्रकारितेचा अभ्यासक्रम एकमेकांना पूरक आहे. कारण भाषेचा पाया मजबूत असल्यामुळे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाशी जुळवून घेणे अधिक सोपे होते. अशा प्रकारे एका कोर्सचे ज्ञान दुसऱ्या कोर्सच्या कामकाजात सहजपणे लागू केले जाते. 'जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वन' ही म्हण सगळ्यांच्या परिचयाची असेल. पण आजच्या अटीतटीच्या स्पर्धेत जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ वनची गरज अधिक आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सखोल ज्ञान असल्यामुळे वस्तुनिष्ठ विश्लेषण, योग्य नियोजन आणि उत्तम कामगिरी करण्याची शक्यता अजून वाढते. विषय, उद्योग, ग्राहकांचा कल याबाबत सखोल ज्ञान असल्यामुळे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर भरभराट होण्यास मदत होतेच, पण त्याचबरोबर निष्काळजीपणा, तक्रारी, गैरजसमजदेखील कमी होण्यास मदत होते. ० दुसऱ्यांपेक्षा 'भिन्न' आणि 'ज्ञात' असणे इंटर-रिलेटेड कोर्स केल्याचे संभाव्य फायदे आपण वरती पाहिलेच. याशिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा व्यक्तींना त्या क्षेत्रातील गुंतागुंतीच्या गोष्टी तसेच त्यांचे निराकरण करणे सहज जमते. हाच गुणधर्म त्यांना दुसऱ्यांपेक्षा 'भिन्न' आणि 'ज्ञात' बनवतो आणि याचा फायदा त्यांच्या करिअर कारकिर्दीत होतो. केवळ ट्रेंडचा पाठपुरावा करून कोर्स करण्यापेक्षा तुमची बुद्धिमता, रुची, कार्यक्षेत्र इत्यादींचा विचार करून अशा कोर्सची निवड करा. ज्याचा तुम्हाला दीर्घकाळ फायदा होईल, पण त्याचबरोबर कंपनीत किंवा उद्योगात तुमचे वेगळे स्थान निर्माण होण्यास मदत होईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eSdHym
via nmkadda