Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १४ जुलै, २०२१, जुलै १४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-14T10:47:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

जेईई मेन परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर; परीक्षा आता २७ जुलैला देखील Rojgar News

Advertisement
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ()जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम मेन (JEE Main) च्या तिसऱ्या सत्राचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार जेईई मेन परीक्षा आता २७ जुलै २०२१ रोजी देखील होणार आहे. म्हणजेच २०, २२, २५ आणि २७ जुलै २०२१ रोजी ही परीक्षा होणार आहे. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा २० ते २५ जुलै या कालावधीत होणार होती. या तिसऱ्या सत्राच्या परीक्षेचे अॅडमिट कार्डदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवार जेईई मेन अॅडमिट कार्ड jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करू शकतात. जेईई मेन परीक्षा कोविड-१९ गाईडलाइन्सचे कटाक्षाने पालन करीत सर्व परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. सर्व उमेदवारांना फेस मास्क देण्यात येणार आहेत. Admit Card: अॅडमिट कार्ड असे करा डाऊनलोड स्टेप १ - 'JEE Main admit cards for April session' लिंक वर क्लिक करा. स्टेप २- आता विचारलेली माहिती भरा. स्टेप ३ - अॅडमिट कार्ड तुमच्या समोर स्क्रीनवर उघडेल. स्टेप ४ - आता अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा. स्टेप ५ - भविष्यातील संदर्भासाठी अॅडमिट कार्डचं प्रिंटआउट अवश्य घ्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सी देशभरात विविध ३३४ शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर ही संगणकीकृत परीक्षा (CBT) घेणार आहे. काही केंद्रे देशाबाहेरदेखील आहेत. जेईई मेनच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा २७ जुलै पर्यंत लांबल्याने चौथ्या सत्राची परीक्षा देखील लांबणीवर जाऊ शकते, कारण चौथ्या सत्राची परीक्षा २७ जुलै पासून सुरू होणार होती. मात्र, एनटीएने चौथ्या सत्राच्या परीक्षेच्या कोणत्याही सुधारित तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B4vDiu
via nmkadda