Advertisement

CLAT2021, Date Clash: लॉ प्रवेश चाचणी (CLAT)साठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. तसेच JEE Main 2021 च्या तिसऱ्या सत्राची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. २० ते २५ जुलैदरम्यान ही परीक्षा होणार आहे. अशावेळी दोन्ही परीक्षा २३ जुलैच्या दिवशी क्लॅश होत आहेत. एकाच दिवशी दोन्ही परीक्षा येत असल्याने परीक्षार्थींसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ यूनिव्हर्सिटी (CNLU) विद्यार्थ्यांना जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन (JEE) मेन परीक्षेची तारीख बदलण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. एका दिवसात दोन परीक्षा असल्याने ज्या उमेदवारांना अडचण आली आहे ते JEE Main 2021 च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. त्यांना १६ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. CNLU ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती दिली. परीक्षेच्या तारखेत बदल करण्यासाठी अर्ज करताना उमेदवाराला आपले नाव, आईवडीलांचे नाव आणि आपला JEE रोल नंबर टाकून CLAT अकाऊंटमध्ये लॉगिन करावे लागेल. कंसोर्टियनने तारीख बदलण्यास मदत होण्यासाठी ईमेल आयडी clat@consortiumofnlus.ac.in आणि फोन नंबर ०८०-४७१६२०२० जाहीर करण्यात आला आहे. कंसोर्टियनने आपली अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर CLAT admit Card 2021 जाहीर केले आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला मोबाइल नंबर आणि पासवर्डचा उपयोग करुन लॉगिन करावे. इथून तुम्हाला परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल. ऑनलाइन प्रवेश पत्राची प्रिंटआऊट असेल तरच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xLE5RZ
via nmkadda