
SSCResult2021: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल थोड्यावेळात जाहीर होणार आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर मूल्यांकन गुण पद्धतीने हा निकाल जाहीर होत आहे. ही पद्धत प्रत्यक्षात अंमलात आणणं हे तितकसं सोपं नव्हत. यासाठी शिक्षण अधिकारी आणि शिक्षक वर्गाचा चांगलाच कस लागला. करोना काळात रेल्वेसारख्या अनेक सुविधा बंद असताना शिक्षकांनी शाळांमध्ये जाऊन मूल्यमापनाचे काम केले. यासाठी शिक्षकांचे कौतुक तर व्हायलाच हवे. परीक्षाच झाली नसताना निकाल लावण्याची ही पहीलीच वेळ होती. परीक्षा रद्द होण्याच्या निर्णयापासून आज निकाल लागेपर्यंत शिक्षकांना मेहनत घ्यावी लागली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालांत प्रमाणपत्र दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान होणार होती. याचवेळी करोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु होता. त्यावेळी करोनाची स्थिती पाहून परीक्षा कधी होईल? हे सांगण कठीण होतं. करोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि निर्बंध सुरु होते. त्यानंतर १२ मेच्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा रद्द करण्यात आली. २८ मे २०२१ ला दहावीच्या परीक्षेसाठी मूल्यमापन पद्धत जाहीर करण्यात आली. १० जून २०२१ रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण आणि वेबिनार घेण्यात आले. माध्यमिक शाळांना प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण नोंदविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार २३ जून ते २ जुलै या कालावधीत शाळांनी संगणक प्रणालीमध्ये गुण नोंदवले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयानुसार निकाल वेबसाइटवर उपलब्ध असेल. दहावीच्या परीक्षेसाठी ९ लाख ९ हजार ९३१ मुलं आणि ७ लाख ४८ हजार ६९३ मुलींनी नोंदणी केली होती. एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेसाठी होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3B8Hr3k
via nmkadda
0 टिप्पण्या