Advertisement

मुंबई : राज्यात सुमारे तीन हजार शिक्षणसेवकांची पदे () भरण्यास सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. पात्र उमेदवारांसाठी 'पवित्र' पोर्टलच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. राज्यात शिक्षणसेवकांची एकूण ९०८० पदे रिक्त आहेत. त्यातील ५९७० पदे भरण्याची प्रक्रिया फेब्रुवारी २०२० मध्येच पूर्ण करण्यात आली आहे, असेही शिक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. कोव्हिड १९ प्रादुर्भावामुळे काही काळ भरतीप्रक्रिया थांबविण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षणसेवकांची पदे भरण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता तीन हजार पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jU1Pz9
via nmkadda