Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ८ जुलै, २०२१, जुलै ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-08T05:47:42Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

New Education Minister धर्मेंद्र प्रधान देशाचे नवे शिक्षणमंत्री Rojgar News

Advertisement
New Education Minister: रमेश पोखरियाल यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्याात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय झाला. फेरबदल होण्याआधी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस आणि स्टील मंत्रालय होते. याआधी शिक्षण मंत्रालय संभाळणाऱ्या रमेश पोखरियाल यांनी आरोग्याचे कारण देत बुधवारी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून काम पाहतील. भुवनेश्वर (ओडिसा)मधील उत्कल विद्यापीठातून एंथ्रॉपॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले धर्मेंद्र प्रधान तरुणांच्या प्रश्नांवर सक्रीयरित्या काम करत आले आहेत. बेरोजगारी, कौशल्याधारित शिक्षण या मुद्द्यांवर त्यांनी काम केले आहे. आता त्यांच्याकडून देशातील विद्यार्थी आणि पालक वर्गाला अनेक अपेक्षा आहेत. नीट (यूजी) २०२१ देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांमधील मेडिकल आणि डेंटल प्रवेश परीक्षा-राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (यूजी) म्हणजे नीट (यूजी) संदर्भात विद्यार्थी माजी शिक्षणमंत्र्यांना अनेक प्रश्न विचारत राहीले. करोनाच्या पार्श्वभूमीवर नीट यूजी २०२१ परीक्षेची तारीख पुढे ढकलावी ही देशभरातील विद्यार्थ्यांची मागणी आहे. नीट २०२१ नोंदणी लवकर सुरु करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. जेईई मेन्स २०२१ माजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी काही दिवसांपुर्वीच एप्रिल आणि मे सत्रासाठी होणाऱ्या जेईई मेन्स २०२१ परीक्षांच्या तारखांची घोषणा केली. पण विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांच्या तारखांमध्ये १५ ते २० दिवसांचा फरक हवाय. पण एनटीएनने एप्रिल सत्रासाठी २० ते २५ जुलै आणि मे सत्रासाठी २७ जुलै ते २ ऑगस्ट २०२१ हे वेळापत्रक ठरवले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अनेक प्रस्ताव देशभरातील विद्यापीठांमध्ये लागू गरणे बाकी आहे. उच्च शिक्षण स्तरावर देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रस्ताव लागू करण्यासंदर्भात पाऊले उचलली जात आहेत. पण विद्यापीठ स्तरावर आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शाळा फी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि त्यानंतर वर्ष २०२०-२१ मध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे शालेय फीसमध्ये सवलत द्यावी अशी मागणी पालकवर्गातून होतेय. अनेक राज्य सरकारांनी केवळ शिक्षण शुल्क म्हणजे ट्यूशन फीस घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण खासगी शाळांमधून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याच्या बातम्या येत असतात. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी केंद्रीय स्तरावर शाळा फीस संदर्भात काही विशेष निर्णय घेण्याची देशभरातील पालक वर्ग वाट पाहत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jR3tBt
via nmkadda