TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पात भरती, ५० हजार ते अडीच लाखापर्यंत पगार Rojgar News

Nagpur Metro Rail : महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. यासाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता आणि पगार वेगळा असणार आहे. मूळ जाहिरातीमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बातमीखाली मूळ जाहिरात पाहता येणार आहे. नागपूर महा मेट्रोरेल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यात येणार आहे. पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याात येत आहेत. उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरणे अपेक्षित आहे. तसेच भरलेला अर्ज दिलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेच्या आत पाठवणे अपेक्षित आहे. रिक्त जागांमध्ये व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपप्रमुख प्रकल्प व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवारांना ५० हजार ते अडीच लाखापर्यंत पगार मिळू शकतो. निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. ही मुलाखत घेणारे पॅनल हे विविध क्षेत्रांचे शिक्षण,कौशल्य आणि अनुभव असलेल्या व्यक्ती असतील. उमेदवारांचे संबंधित क्षेत्रातील शिक्षण, अनुभवाच्या अधारे मुलाखत घेण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवाराची आरोग्य चाचणी महा मेट्रोने दिलेल्या रुग्णालयांमध्ये होईल. याचा तपशिल वेबसाइटवर देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर, पिनकोड- ४४००१० वर अर्ज पाठविणे गरजेचे आहे. दिनांक २९ जुलै २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत पोहोचतील अर्ज पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलवर मुलाखती संदर्भात डिटेल्स पाठवण्यात येईल. महामेट्रोची अधिकृत वेबसाइट www.mahametro.org वर यासंदर्भात अपडेट माहिती देण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TY7Y2L
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या