Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, २७ जुलै, २०२१, जुलै २७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-27T10:43:13Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

'त्या' विद्यार्थ्यांसाठी वेगळा सीईटी अभ्यासक्रम ठेवणार? मुंबई हायकोर्टाचा सवाल Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : 'सर्व विद्यार्थी तुमच्या एसएससी बोर्डातून उत्तीर्ण झालेले नसतील, तर सर्वांसाठी सीईटीकरीता () त्याच बोर्डाचा अभ्यासक्रम ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे सीबीएसई व आयसीएसई बोर्डच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेतील सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम ठेवला जाऊ शकतो का, ते स्पष्ट करा. वेगळ्या अभ्यासक्रमाला परवानगी दिली जाणार नसेल, तर मग प्रवेशासाठी सीईटी परीक्षार्थींना प्राधान्य देण्याची अट मागे घेणार का, हे स्पष्ट करा', अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली आहे. तसेच याविषयीची भूमिका २८ जुलै रोजी स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले आहेत. सीईटी ही केवळ एसएससीच्या अभ्यासक्रमावरच आधारित असेल, असे स्पष्ट करणाऱ्या राज्य सरकारच्या २८ मे रोजीच्या अधिसूचनेला आयसीएसई बोर्डच्या दादरमधील आयईएस ओरायन स्कूलमधील अनन्या पत्कीने तिचे वडील अॅड. योगेश पत्की यांच्यामार्फत रिट याचिका करून आव्हान दिले आहे. याविषयी न्या. रमेश धनुका व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 'अनन्याने नववीपासून विज्ञान विषय वगळला असल्याने दोन वर्षे त्याचा अभ्यास केलेला नाही. त्यामुळे सर्व बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एसएससी बोर्डचाच अभ्यासक्रम ठेवणे हे भेदभावपूर्ण आहे. राज्यभरात एसएससी बोर्डचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी असून सर्वच विद्यार्थी बहुधा सीईटीला बसणार नाहीत. नामांकीत कॉलेजांमधील प्रवेशासाठी स्पर्धा करणारे हुशार विद्यार्थीच सीईटी देणे पसंत करतील, असे सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे एसएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही हे भेदभावपूर्ण आहे', असा युक्तिवाद अॅड. पत्की यांनी मांडला. तर 'सर्व शिक्षण मंडळांनी करोनाच्या संकटामुळे दहावीची परीक्षा घेणे रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावले. अशा परिस्थितीत नामांकीत कॉलेजांमधील प्रवेशाच्या स्पर्धेमुळे सीईटीचा पर्याय आणला आहे. सर्वांना समान वागणूक मिळायला हवी आणि राज्य सरकार कोणालाही सीईटी देण्यास सक्ती करत नसून ती ऐच्छिक आहे. सीबीएसई व आयसीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्डच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय आहे', असे म्हणणे मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया व सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी मांडले. मात्र, 'कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हा तिचा हक्क आहे. परंतु, आयसीएसई बोर्डचा दहावीचा अभ्यासक्रम वेगळा असताना ती एसएससी बोर्डच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी कशी देऊ शकेल?', असे म्हणणे पत्की यांनी मांडले. खंडपीठानेही त्याविषयी सहमती दर्शवली आणि आयसीएसई व सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीकरीता वेगळा अभ्यासक्रम ठेवला जाऊ शकतो का? अशी विचारणा राज्य सरकारला केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BLjwYd
via nmkadda