Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T13:47:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा, डिजीटल एज्युकेशन स्थितीचा आढावा Rojgar News

Advertisement
Digital Education System: केंद्रीय धर्मेंद्र प्रधान यांनी (Union ) पदभार स्वीकारल्यापासून अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. नुकतेच त्यांनी प्रलंबित असलेल्या नीट यूजी परीक्षा २०२१ ची घोषणा केली. यानुसार अर्ज प्रक्रियादेखील सुरु होतेय. यासोबतच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाच्या विषयावर चर्चा केली. या बैठकीत देशातील डिजीटल शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या मिटींगमध्ये शिक्षणमंत्र्यांनी डिजीटल शिक्षणाच्या पुढाकाराबद्दल माहिती घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना पंतप्रधान ई शिक्षण, नॅशनल डिजीटल शिक्षण वास्तुकला (NDEAR), swayam सहित इतर प्लॅटफॉर्मबद्दल माहिती दिली. यादरम्यान शिक्षणमंत्र्यांनी शिक्षणातून औद्योगिक संधी उपलब्ध होण्यावर भर दिला. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणात सातत्य ठेवण्यासाठी डिजिटल शिक्षण आणखी मजबूत करण्यावर भर दिला. यामुळे अभ्यासात कोणती अडचण येणार नसल्याचे ते म्हणाले. या बैठकीत राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी Minister of State Annpurna Devi), राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह (Minister of State Rajkumar Ranjan Singh) आणि राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार ष (Minister of State Dr Subhas Sarkar)सहभागी झाले होते. यासोबतच शिक्षणमंत्र्यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल देखील महत्वाची बैठक घेतली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून धोरणाच्या प्रगतीचा अहवाल घेतला. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी वेळेत लागू करण्यासाठी मंत्रालयातर्फे योजना आखण्यात आली आहे. यावेळी त्यांनी सर्वांना शिक्षण मिळण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्य शिक्षणावर भर दिला. माजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी राजीनामा दिल्यानंतर धर्मेद्र प्रधान यांनी पदभार स्वीकारला. करोनाच्या पार्श्वभुमीवर ढासळलेल्या शिक्षणव्यवस्था उभारी देण्याचे आव्हान केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्यासमोर असणार आहे. ऑनलाइन शिक्षणापासून, परीक्षांच्या निकालापर्यंत अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांचे निवारण नव्या शिक्षणमंत्र्यांकडून अपेक्षित आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r4P2eR
via nmkadda