TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

दहावीच्या निकालासाठीचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत होईल: शिक्षणमंत्री Rojgar News

SSC Result Website: दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पूर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही प्रा. गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत. दहावीचा निकाल शुक्रवारी १६ जुलै रोजी दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र १ वाजल्यापासूनच निकाल पाहण्यासाठी दिलेले दोन्ही संकेतस्थळ क्रॅश झाले आणि लाखो विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. निकाल लागला असूनही तो विद्यार्थ्यांना कळत नव्हता, लाखोंच्या संख्येने वारंवार ही संकेतस्थळे पाहिली जात असल्याने सर्व्हर डाऊन होऊन 'सर्व्हिस अनअव्हेलेबल' असा मेसेज येऊ लागला. सायंकाळी उशिरापर्यंत हा घोळ सुरू होता. अखेर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. दहावीचा निकाल ९९.९५ टक्के राज्यातून १५ लाख७५ हजार ७५२ विद्यार्थ्यांचे दहावीचे गुण शाळांकडून मिळाले, त्यापैकी १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ९९.९५ आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. निकालाची वैशिष्ट्ये - - निकालात मागील वर्षीच्या तुलनेत ४.६५ टक्के वाढ - कोकण विभाग अव्वल, १०० टक्के निकाल - ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण - नागपूरचा निकाल सर्वात कमी - यंदाही मुलींचीच बाजी - राज्यात केवळ ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z4bAyX
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या