
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सात शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांनी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे सादर केला आहे. यामध्ये नवी मुंबईतील पाच आणि मुंबईती दोन शाळांचा समावेश आहे. मान्यता काढून घेण्याची कारवाई होणार असलेल्या शाळांमध्ये नवी मुंबईतील नेरूळ येथील अमृता विद्यालय, ऐरोली येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूल, सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूल, वाशी येथील सेंट लॉरेन्स स्कूल आणि कोपरखैरणे येथील तेरणा ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल या शाळांचा समावेश आहे. मुंबतील मालाड व सांताक्रूझ येथील बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूल या शाळांचा समावेश आहे, असे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी स्पष्ट केले. करोना कालावधीत सर्वत्र ऑनलाइन शिक्षण असतानाही शुल्कवाढ करणे, पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावणे, शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल न देणे, विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रवेश न देणे, विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देणे; तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून कमी करणे, आदी आक्षेप या शाळांवर ठेवण्यात आले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी खारघर येथील विश्वज्योत हायस्कूल या शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्या शिफारशीसह प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे पाठवला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AMzMrc
via nmkadda
0 टिप्पण्या