
2021: भारतीय स्टेट बॅंकेने क्लर्क मुख्य परीक्षा पुढील सूचना येईपर्यंत स्थगित केली आहे. SBI क्लर्क मुख्य परीक्षा १३ जुलै २०२१ ला होणार होती. बॅंकेने आतापर्यंत नव्या तारखांची घोषणा केली नाही. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन नोटिफिकेशन तपासू शकतात. SBI प्रिलिम्स परीक्षा १० जुलै ते १३ जुलैपर्यंत आयोजित करण्यात आली होती. SBI क्लर्क (ज्युनिअर असोशिएट) प्रिलिम्स परीक्षा १० जुलै ते १३ जुलैपर्यंत देशातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. मुख्य परीक्षेत बसण्यासाठी उमेदवारांना प्रिलिम्स परीक्षा पास होणे गरजेचे आहे. ५ हजारहून अधिक ज्युनिअर असोशिएट्स पदांवर भरती एसबीआय क्लर्क परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरु झाली होती. या भरती प्रक्रियेमध्ये ५ हजारहून अधिक ज्युनिअर असोशिएटची भरती केली जाणार होती. मेरीट लिस्टमध्ये स्थान मिळवण्यासाठी उमेदवारांना सर्व तीन टप्पे (प्रारंभिक, मुख्य आणि मुलाखत) पार करावे लागतात. निवडल्या गेलेल्या उमेदवाराला देशभरातील बॅंकेच्या विविध शाखांमध्ये नियुक्ती दिली जाते. परीक्षा स्थगित आता एसबीआयने परीक्षेसंबंधी एक परिपत्रक जारी केलं आहे. यात असं म्हटलंय की कोविड-१९ महामारी (Covid-19) मुळे ज्युनिअर असोसिएट्स पदांच्या भरतीसाठी पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणा नंतर केली जाईल. वेबसाइट पाहा ऑनलाइन पूर्व परीक्षेत १९० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा २ तासांच्या कालावधी असेल. यात जनरल फायनान्शिअल, इंग्रजी भाषा (English language), संख्यात्मक क्षमता (Numerical ability) आणि तर्क क्षमता (reasoning ability) अशा भागात परीक्षा होईल. परीक्षेच्या तारखा जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट पाहणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xRquZq
via nmkadda
0 टिप्पण्या