Advertisement

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यात शाळा सुरू करण्याबाबत सुरू केलेल्या सर्वेक्षणाला पहिल्याच दिवशी पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून, ८४ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यास अनुकूल मत नोंदविले आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी राज्यातील जवळपास सव्वा दोन लाख पालकांनी मते नोंदविली असून, ऑनलाइन शिक्षणाऐवजी आता पालकांनीही शाळेतच वर्ग भरावेत, अशी इच्छा असल्याचे दिसून येते. करोनामुक्त भागामध्ये शाळा सुरू करण्यात याव्यात का, या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) एक राज्यव्यापी सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये राज्यातील पालक आणि शिक्षकांची शाळा सुरू करण्याबाबत मते नोंदवली जात आहेत. १२ जुलैपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार असले, तरी सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सुमारे सव्वा दोन लाख पालकांनी सर्वेक्षणात सहभाग घेऊन आपली मते नोंदवल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील १ लाख ४० हजार ४२४ पालक हे ग्रामीण भागातील असून शहरी भागातील पालकांची संख्या एक लाख ७२७ आहे. निमशहरी भागातील २७ हजार ९६५ पालकांनी आपली मते नोंदवली आहेत. यापैकी एकूण दोन लाख २४ हजार ४५१ (८४ टक्के) पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले आहे. ४४ हजार ६६५ (१६.६ टक्के) पालक अजूनही मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून अनेक पालक संघटनांकडूनही शाळा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकही आता शाळा सुरू करण्याबाबत आग्रही असल्याचे चित्र दिसत आहे. सर्वेक्षणातील आकडेवारी सर्वेक्षणातील विभाग सहभागी पालक शहरी भाग १,००,७२७ निमशहरी भाग २७,९६५ ग्रामीण भाग १,४०,४२४ शाळा सुरू करण्यास होकार - २,२४,४५१ (८४ टक्के) शाळा सुरू करण्यास नकार - ४४,६६५ ( १६ टक्के) आतापर्यंत सहभागी झालेले पालक - २,६९,११६
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kam7V8
via nmkadda