Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १२ जुलै, २०२१, जुलै १२, २०२१ WIB
Last Updated 2021-07-12T11:47:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

SSB HC Recruitment 2021: हेड कॉन्स्टेबल पदाची भरती; आजच करा अर्ज Rojgar News

Advertisement
SSB HC Recruitment 2021: सशस्त्र सीमा दल (एसएसबी) मध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा बलाने (एसएसबी) ग्रुप सी मध्ये हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल) पदाच्या भरतीसाठी जाहिरात दिली आहे. हेड कॉन्स्टेबलची एकूण ११५ पदे रिक्त आहेत. कसा करायचा अर्ज? एसएसबी हेड कॉन्सटेबल भरती 2021 अधिसूचनेनुसार, अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एसएसबीचं भरती पोर्टल ssbrectt.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. एसएसबी द्वारे हेड कॉन्स्टेबल पदांसाठी ऑनलाइन अर्जांची अंतिम मुदत जाहिरातीच्या दिवसापासून ३० दिवसांच्या आत म्हणजेच ८ ऑगस्ट २०२१ आहे. उमेदवारांनी ध्यान द्यावे की ऑनलाइन अर्जांसाठी त्यांना १०० रुपये अर्ज शुल्कदेखील भरावे लागणार आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे. मात्र एससी, एसटी, एक्स-सर्विसमेन आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे. पात्रता काय? एसएसबी हेड कॉन्सटेबल भरती 2021 अधिसूचनेनुसार अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. सोबत इंग्रजीत किमान ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदत किमान ३० शब्द प्रति मिनिट कॉम्प्युटरवर टायपिंगचा वेग असायला हवा. याव्यतिरिक्त उमेदवाराचे वय अर्जाच्या अखेरच्या तारखेला १८ ते २५ वर्षादरम्यान असावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3igEkOv
via nmkadda