Advertisement

2021: कर्मचारी निवड आयोगाने (SSC)ज्युनियर इंजिनीअर पेपर 1 परीक्षा 2020 ची अंतिम उत्तरतालिका (Answer Key) जारी करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइट वर आन्सर की उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती ते ssc.nic.in ला भेट देऊन फायनल आन्सर की तपासू शकतात. आयोगाने आन्सर कीसह प्रश्नपत्रिका देखील अपलोड केली आहे. आन्सर की ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत वेबसाइट वर उपलब्ध राहील. पुढील पद्धतीने पाहा फायनल आन्सर की - फायनल आन्सर की पाहण्यासाठी, उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत वेबसाइट, ssc.nic.in वर जावे. - यानंतर होमपेज वर उपलब्ध लेटेस्ट न्यूज सेक्शन मध्ये संबंधित परीक्षेच्या आन्सर की लिंक वर क्लिक करा. - आता एक नवं पेज उघडेल. येथे ज्युनियर इंजिनीअर पेपर 1 परीक्षेची फायनल आन्सर की ची लिंक उपलब्ध आहे. - या लिंक वर क्लिक केल्यानंतर, पुन्हा एक नवे टॅब उघडेल. - येथे उमेदवार आपला रोल नंबर आणि पासवर्ड देऊन लॉगइन करू शकतील. - आता तुम्ही आन्सर की पाहू शकता. - उमेदवार क्वेश्चन पेपर आणि आन्सर की डाऊनलोड करून प्रिंट काढू शकतात. ज्युनियर इंजिनीअर पेपर १ परीक्षा २२ मार्च ते २४ मार्च २०२१ पर्यंत आयोजित करण्यात आली होती. परीक्षेचे आयोजन दोन सत्रात केले होते. पहिली शिफ्ट सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आणि दुसरी शिफ्ट दुपारी २ दे सायंकाळी ४ वाजेपर्यंत होती. या परीक्षेचा निकाल ३० जून २०२१ रोजी जाहीर करण्यात आला होता. ज्या उमेदवारांनी पेपर १ परीक्षा मध्ये यशस्वी झालेले उमेदवार आता पेपर २ ची परीक्षा देण्यास पात्र आहेत. पेपर 2 परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे. अद्ययावत माहितीसाठी उमदेवारांनी एसएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी. परीक्षेच्या संबंधीची कोणत्याही प्रकारची माहिती वेबसाइटच्याच माध्यमातून जाहीर करण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hv73jr
via nmkadda