Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ८ जुलै, २०२१, जुलै ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-08T11:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

AICTEतर्फे डिफेन्स टेक्नोलॉजीमध्ये एमटेक अभ्यासक्रम, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
AICTE Programe : ऑल इंडिया काऊंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education has revised the AICTE) तर्फे डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक कोर्स आणला जात आहे. या पीजी प्रोग्रामच्या माध्यमातून कॉम्बॅक्ट व्हेइकल इंजिनीअरिंग (Combat vehicle engineering), एअरोस्पेस टेक्नोलॉजी (aerospace technology), कम्युनिकेशन सिस्टीम अॅण्ड सेंसर, डायरेक्टर एनर्जी टेक्नोलॉजी (Communication systems and sensors technology, नेव्हल टेक्नोलॉजी अॅण्ड हाय एनर्जी मटेरियल्स टेक्नोलॉजी (naval technology and high energy materials technology)चे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे (AICTE Chairman Anil D Sahasrabudhe)आणि सचिव डीआरडीओ चेअरमन जी. सतीश रेड्डी (Secretary DDR&D and Chairman DRDO G. Satheesh Reddy) यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हा अभ्यासक्रम एआयसीटीईच्या संबंधित सर्व संस्थांमध्ये सादर केला जाणार आहे. या कोर्ससंदर्भात इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती मिळू शकते. याशिवाय एसआयसीटीईने केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) आणि शिक्षण मंत्रालयच्या इनोव्हेशन सेलच्या सहयोगाने 'इनोव्हेशन एम्बेसिडर प्रोग्राम'ची घोषणा करण्यात आली होती. या अभ्यासक्रमा अंतर्गत ५० हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. १६ जुलैपासून या अभ्यासक्रमाची सुरुवात होईल. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिटिकल थिंकिंग सारख्या गुण विकसित करण्याच्या हेतून शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. या ऑनलाइन प्रोग्राममध्ये सहभागी होण्यासाठी बोर्डाने शाळांकडून १० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hrhFzL
via nmkadda