Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २४ जुलै, २०२१, जुलै २४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-24T09:43:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

UPSC CMS Exam 2021: विविध पदांच्या ८३८ जागांवर भरती Rojgar News

Advertisement
UPSC Recruitment 2021: यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एकूण ८३८ पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्युनियर स्केल, असिस्टंट डिविजन मेडिकल ऑफिसर सह एकूण विविध ८३८ पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. PSC ऑर्गनायजेशन MBBS योग्यता असणारे पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही ८३८ ज्युनिअर स्केल, असिस्टंट डिविजन मेडिकल ऑफिसर आणि अन्य पदे दिल्लीतील आहेत. UPSC जॉब्स 2021 साठी नोकरीचा अर्ज २७ जुलै २०२१ किंवा त्यापूर्वी ऑनलाइन स्वीकारले जातील. पात्रता परीक्षा देण्यासाठी उमेदवारांनी फायनल MBBS लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षा उत्तीर्ण केली असावी. महत्त्वाच्या तारखा या सर्व पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया ७ जुलैपासून सुरू झाली आहे. उमेदवार २७ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क जनरल आणि ओबीसी उम्मीदवारांसाठी अर्जाचे शुल्क २०० रुपये आहे, तर SC/ ST/एक्स- सर्विसमन प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क असणार नाही. परीक्षा शुल्काचा भरणा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगच्या माध्यमातून करता येईल. परीक्षेची तारीख उमेदवाराची निवड परीक्षेच्या माध्यमातून होईल. परीक्षेचे आयोजन ११ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले आहे. वयोमर्यादा सर्वसाधारण गटातील उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२१ रोजी ३२ वर्ष असाते. तर SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे. पदांची माहिती सेंट्रल हेल्थ सर्व्हिस ज्युनियर स्केल- ३४९ पदे असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल सर्टिफिकेट- ३०० पदे GDMO (नवी दिल्ली पालिका)- ५ पदे जनरल ड्युटी मेडिकल ग्रेड- II I (EDMC, NDMC & SDMC)- १८४ पदे अर्ज कसा करावा? ऑनलाइन अर्ज करण्याआधी पुढे दिलेले विस्तृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. जर तुम्ही ज्युनियर स्केल, सहायक डिव्हीजन मेडिकल ऑफिसर पदांच्या पात्रतेत बसत असतील, ते पुढे दिलेल्या ऑनलाइन लिंक वर क्लिक करा. तुम्ही ७ जुलै २०२१ ते २७ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eTLwyS
via nmkadda