Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २४ जुलै, २०२१, जुलै २४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-24T09:43:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IBPS Clerk admit card: क्लर्क भरती २०२१ साठी प्रवेश पत्र जाहीर, असे करा डाऊनलोड Rojgar News

Advertisement
Clerk (Office Assistant) 2021 : इंस्टीट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)ने आरआरबी ऑफिस असिस्टंट/क्लर्क भरती परीक्षेसाठी प्रवेश पत्र जाहीर केले आहे. आयबीपीएसची वेबसाइट .in वर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची लिंक देण्यात आली आहे. हे प्रवेश पत्र आयबीपीएस आरआरबी क्लर्क प्रिलिम्स एक्झाम २०२१ (IBPS RRB Clerk prelims 2021)साठी आहे. ज्या उमेदवारांनी आयबीपीएस आरआरबी ऑफिस असिस्टंट परीक्षा २०२१ (IBPS RRB Office Assistant Exam 2021) साठी अर्ज केलाय ते आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. आयबीपीएस ऑफिस असिस्टंट (क्लर्क) भरतीची प्रारंभिक परीक्षा १४ ऑगस्टला होणार आहे. यासाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची लिंक वेबसाइटवर १४ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. उमेदवार रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डने लॉगिन करुन आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकतात. यानंतर भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घेऊन ठेवा. IBPS RRB Office Assistant Exam Pattern: परीक्षा पॅटर्न कसा असेल? आयबीपीएस ऑफिस असिस्टंट प्रिलिम्स एक्झाम ४५ मिनिटांची असेल. ही परीक्षा एकूण ८० गुणांची असून यात ८० प्रश्न विचारले जातील. रिजनिंगचे ४० प्रश्न आणि न्यूमेरिकल एबिलिटीचे ४० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. आयबीपीएस ऑफिस असिस्टंट मेन एक्झाम २ तासांची असेल. त्यात एकूण २०० प्रश्न विचारले जातील. तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये परीक्षा देऊ शकता. रिजनिंग- ४० प्रश्न - ५० गुण कॉम्प्युटर नॉलेज- ४० प्रश्न - २० गुण जनरल नॉलेज- ४० प्रश्न - ४० गुण इंग्रजी भाषा- ४० प्रश्न - ४० गुण हिंदी- ४० प्रश्न - ४० गुण न्यूमरिकल एबिलिटी- ४० प्रश्न - ५० गुण


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TCRZag
via nmkadda