Advertisement

exam: यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाने CSE परीक्षेसाठी १२ जुलै पासून परीक्षा केंद्रात बदल करण्यासाठी विंडो खुली केली आहे. ज्या उमेदवारांना आपल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करुन घ्यायचा आहे ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन बदल करु शकतात. उमेदवारांना ३० जुलैपर्यंत बदलण्याची संधी आहे. परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यासाठी उमेदवाराला केंद्रीय लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर जावे लागेल. यानंतर होमपेजवर परीक्षा केंद्र बदलण्यासाठी ऑनलाइन अर्जावरील लिंकवर क्लिक करायला हवे. आता तुमच्यासमोर एक पेज खुले होईल. इथे परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय असेल त्या लिंकवर क्लिक करा. आता दिलेले निर्देश वाचून पुढे जा. यानंतर उमेदवाराने आपला नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा नंबर भरुन क्लिक करावे. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करु शकता. यूपीएससीने परीक्षा केंद्र बदलण्यासंदर्भातील नोटीस अधिकृत वेबसाइट upsc.gov.in नुकतीच जाहीर केली होती. यामध्ये सांगितल्याप्रमाणे दोन फेजमध्ये परीक्षा केंद्र बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करु शकता. पहिल्या फेजमध्ये १२ जुलै ते १९ जुलैपर्यंत आणि दुसऱ्या फेजमध्ये २६ जुलै ते ३० जुलैपर्यंत परीक्षा केंद्रामध्ये बदल करु शकता. अधिक माहितीसाठी वेबसाइटवरील नोटीस तपासणे गरजेचे आहे. UPSC प्रीलिम्स परीक्षा आधी जून २०२१ मध्ये आयोजित केली जाणार होती, पण करोना महामारीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली होती. नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या उमेदवारांची मोठी संख्या लक्षात घेता आयोगाने परीक्षा केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीएससीने आपल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. यामध्ये अल्मोडा, उत्तराखंड, श्रीनगर, नाशिक, महाराष्ट्र आणि सूरतम या ठिकाणी चार अतिरिक्त केंद्र चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच नागरी सेवा प्रिलिम्स सहित इतर परीक्षेच्या उमेदवारांना आपले केंद्र आपल्या इच्छेनुसार बदलण्याचा निर्णय घेता येणार आहे. परीक्षा केंद्रामध्ये बदल हे प्रथम अर्जास प्राधान्य तत्वावर करण्यात येणार आहे. याशिवाय आधी देण्यात आलेल्या नियम आणि अटींमध्ये कोणता बदल होणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपले परीक्षा केंद्र बदलायचे नाही त्यांना लॉगिनमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eia843
via nmkadda