Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १४ जुलै, २०२१, जुलै १४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-14T07:47:15Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CLAT Admit Card 2021: क्लॅट परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड जारी Rojgar News

Advertisement
कन्सोर्टिअम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज ()कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) अर्थात क्लॅट परीक्षेसाठी प्रवेश पत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड ()जारी केले आहेत. देशभरातील विविध विधी अभ्यासक्रमाच्या संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. २०२१-२२ या वर्षाच्या प्रवेशांकरिता क्लॅट परीक्षा २३ जुलै २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना बुधवार १४ जुलै २०२१ पासून अॅडमिट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अन्य सर्व उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार असले तरी उत्तर पूर्व राज्यांसाठी प्रवेशपत्र म्हणजेच अॅडमिट कार्ड उपलब्ध करण्यात येणार नाहीत. पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी यूजी अॅडमिट कार्ड २०२१ आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी पीजी अॅडमिट कार्ड २०२१ उमेदवार सीएनएलयूची ऑफिशियल वेबसाइट, consortiumofnlus.ac.in येथून डाउनलोड करू शकतील. पुढील पद्धतीने करा डाऊनलोड - १) उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जावे. २) मोबाइल क्रमांक आणि पासवर्डच्या सहाय्याने लॉगिन करावे. ३) लॉगिन केल्यानंतर डाऊनलोड अॅडमिट कार्ड पर्यायावर क्लिक करा. ४) अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ५) प्रिंटआऊट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपीदेखील उमेदवारांनी सेव्ह करावी. परीक्षेचा पॅटर्न CLAT 2021 मध्ये सब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न नसतील. विद्यार्थ्यांना एमसीक्यू प्रकारचे १२० प्रश्न परीक्षेत विचारले जातील. परीक्षेसाठी १२० मिनिटांचा कालावधी असेल. डिस्क्रिप्टिव्ह सेक्शनही असणार नाही. क्लॅट परीक्षेत पात्र ठरणारे विद्यार्थी देशातील २२ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी अर्ज करू शकतात. क्लॅट अॅडमिट कार्ड 2021 साठी हेल्पलाइन जारी सीएनएलयूने क्लॅट एडमिट कार्ड 2021 मध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास किंवा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी हेल्पलाइन जारी केली आहे. विद्यार्थी अधिकृत ईमेल आईडी - clat@consortiumofnlus.ac.in वर ईमेल करून किंवा ०८०-४७१६२०२० या क्रमांकावर कार्यालयीन दिवसात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत फोन करून मदत घेऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wBTL8L
via nmkadda