TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

World Youth Skills Day: तरुणांमध्ये कौशल्य विकास हीच देशाची गरज- पंतप्रधान Rojgar News

PM Modi on Skilled Development:नव्या पिढीच्या तरुणांमध्ये असणे ही देशाची गरज असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. कौशल्य विकास हा आत्मनिर्भर भारताचा खूप मोठा आधार असल्याचे ते म्हणाले. वर्ल्ड यूथ स्किल डे २०२१ च्या निमित्ताने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी कौशल्य विकास शिक्षणाचे महत्व सांगितले. गेल्या ६ वर्षांमध्ये कौशल्य विकास आणि आत्मनिर्भर भारताचा पाया बनला आहे. देशामध्ये नव्या संस्था तयार झाल्या आहेत. ही पूर्ण ताकद लावून आपल्या नव्या पद्धतीने स्किल इंडिया मिशनला गती द्यायला हवी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपण विजयादशमीला शस्त्रांची पूजा करतो. अक्षय तृतीयेला शेतकरी शेतीची आणि शेती यंत्राची पूजा करतात. विश्वकर्मा देवाची पूजा ही तर आपल्या देशात प्रत्येक शिल्प, कौशल्या संबंधित जोडल्या गेलेल्यांसाठी मोठे पर्व असल्याचे ते म्हणाले. शिक्षण हे तुमच्या कमाईसोबत थांबू नये हे सध्या महत्वाचे आहे. आजच्या जगात कौशल्य शिक्षणाची खूप मागणी आहे. ज्याच्याकडे कौशल्य असेल तोच प्रगती करेल असे पंतप्रधान म्हणाले. ही बाब व्यक्ती आणि देश सर्वांवर लागू होते. भारत जगाला स्मार्ट आणि स्किल्ड मॅन पॉवर सोल्यूशन देऊ शकेल. त्यामुळे हे आपल्या तरुणांच्या कौशल्य धोरणाचे मूल्य असायला हवे असे ते पुढे म्हणाले. हे पाहता ग्लोबल स्किल गॅपची मॅपिंग होणे हे कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hHRbtC
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या