TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

SSC Result 2021: दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता; आठवड्याभराने लागणार? Rojgar News

SSC Result 2021: दहावीचा निकाल कधी लागणार? याची उत्सूकता राज्यातील विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. दहावीचा निकाल () १५ जुलैपर्यंत लागेल अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister VArsha Gaikwad) यांनी दिली होती. राज्य सरकारने दिलेली ही डेडलाइन आज संपली. दरम्यान दहावीच्या निकालाचे काम आटोक्यात आले असून काही त्रुटी राहील्यात असे राज्य शिक्षण बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात शाळा आणि शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात त्रुटी राहील्याचे समोर येत आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागण्यास अजून आठवडाभराचा वेळ लागण्याची शक्यता आहे. शाळांकडून सुरु असलेले दहावीच्या निकालाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. तसेच विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण सिस्टीममध्ये भरण्याचे काम देखील पूर्ण होत आल्याचे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती विभागीय मंडळाकडे येणार असून ही सर्व माहिती एकत्र करुन दहावी परीक्षेचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. पण प्रत्यक्षात शाळा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची माहिती संगणक प्रणालीत भरण्यास उशीर लागत असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे दहावीच्या निकालास आणखी उशीर होऊ शकतो. दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या निकालासंदर्भातील माहितीसाठी या वेबसाइटवर लक्ष ठेवून राहावे लागेल. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ४ हजार ४४१ विद्यार्थी उपस्थित होते. करोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण १५ लाख ९२ हजार ४१८ हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या मूल्यांकन पद्धतीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या शालांतर्गत झालेल्या परीक्षा आणि असेसमेंटच्या आधारे गुण दिले जाणार आहेत. यातील ५० टक्के वेटेज हे नववीतील गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत. तर ३०टक्के वेटेज हे इंटरनल असेसमेंट आणि उर्वरीत २० टक्के वेटेज हे प्रॅक्टीकल आणि होमवर्कच्या असाइनमेंटला दिले जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3egRZUk
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या