Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट १०, २०२१ WIB
Last Updated 2021-08-10T10:44:00Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Bank Clerk Jobs 2021: राज्यातील 'या' बँकेत क्लर्क भरती; शेकडो पदे रिक्त Rojgar News

Advertisement
PDCC Bank Clerk Recruitment 2021: तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला बॅंकेत नोकरी करण्याची संधी आहे. पुणे जिल्ह्यातील सेंट्रल कॉ-ऑपरेटीव्ह बॅंक (PDCC Bank) मध्ये क्लर्क पदाच्या (Clerk Vacancy)शेकडो रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. उमेदवाराची वयोमर्यादा, पगार आणि इतर पात्रता निकष नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. पुण्याच्या पीडीसीसी बॅंकेत क्लर्क पदाच्या ३५६ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी निवडल्या गेलेल्या उमेदवारास प्रति महीना २२ हजार रुपये बेसिक पगार आणि सरकारी भत्ते मिळून पूर्ण पगार मिळेल. अर्जाचा तपशिल (PDCC Clerk online apply) या (Govt Job)साठी तुम्हाला पीडीसीसी बॅंकच्या वेबसाइट pdccbank.co.in वर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. ७ ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी १६ ऑगस्ट २०२१ वेळ आहे. खुल्या वर्गासाठी ८८५ रुपये अर्ज शुल्क आहे. तर इतरांसाठी अर्ज निशुल्क आहे. अर्ज शुल्क भरण्यास १७ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. पात्रता निकष (PDCC Bank Clerk Eligibility) यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. निवड प्रक्रिया (Selection Process) एका ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VHs95s
via nmkadda