Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट १०, २०२१ WIB
Last Updated 2021-08-10T11:43:49Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government Scholarship: दहावीनंतर 'या' ५ स्कॉलरशिपबद्दल जाणून घ्या, होईल फायदा Rojgar News

Advertisement
Government : देशात नोकरीमध्ये देखील स्पर्धा वाढल्याने केवळ दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना खूप अडचणींचा सामना करावा लागलो. आर्थिक परिस्थिती नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुढचे शिक्षण घेता येत नाही. शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. अशावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सरकारतर्फे अनेक (Scholarship Programe) सुरु करण्यात आले आहेत. गरजू आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी सरकार आणि खासगी संस्थांकडून काही स्कॉलरशिप प्रोग्राम सुरु आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहायतेसोबत कॉलेजमध्ये प्रवेशासाठी () देखील मदत केली जाते. अशा काही स्कॉलरशिपबद्दल जाणून घेऊया. सरस्वती शैक्षणिक शिष्यवृत्ती (SARASWATI ACADEMY SCHOLARSHIP) दहावी बोर्डाची परीक्षा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरस्वती शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी दहावीला असलेले विद्यार्थी देखील अर्ज करु शकतात. सरस्वती शैक्षणिक शिष्यवृत्ती (SAST) साठी निकालाच्या आधारे अर्ज करता येतो. यामध्ये ३० टक्के ते शंभर टक्क्यांपर्यंत शैक्षणिक सहाय्य केले जाते. विद्यार्थ्यांना १५ हजार रुपयांपर्यंत ही स्कॉलरशिप मिळू शकते. पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप (POST-MATRIC SCHOLARSHIP) पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येते. विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना दहावी बोर्ड परीक्षा पास असणे आवश्यक आहे. निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना देखभाल खर्च, पुस्तकांचा खर्च आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना अधिक खर्च दिले जातात. एनसीईआरटी स्कॉलरशिप (NCERT SCHOLARSHIP) सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या एनसीईआरटी स्कॉलरशिपचा उद्देश दहावीतील प्रतिभावान विद्यार्थ्यांना सहायता करणे हा आहे. एनसीईआरटी स्कॉलरशिप प्रोग्रामसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी दोन चाचण्या घेतल्या जातात. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण विभागातर्फे (Department of State Education Research and Training) पहिली राज्य पातळी चाचणी आयोजित केली जाते. दुसरी चाचणी ही राष्ट्रीय स्तरावर नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (NCERT) च्या माध्यमातून आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज भरता येतो. मेधावी स्कॉलरशिप (ALL INDIA MERITORIOUS SCHOLARSHIP) अखिल भारतीय मेधावी स्कॉलरशिप एक ऑनलाइन स्कॉलरशिप आहे. यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागते. ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी दोन्ही बोर्ड परीक्षा दिल्या आहेत, ते यासाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात. अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांना नोंदणी करताना २४९ रुपये शुल्क भरावे लागेल. विद्याधन स्कॉलरशिप (VIDYADHAN SCHOLARSHIP) विद्याधन स्कॉलरशिप प्रोग्राम, सरोजिनी दामोदरन फाऊंडेशनकडून दिली जाते. परीक्षा आणि मुलाखतीतून याची निवड होते. निवडल्या गेलेल्या उमेदवाराला फाऊंडेशनकडून २ वर्षांची स्कॉलरशिप मिळते. सलग चांगला निकाल येत राहील्यास त्यांना पदवी पूर्ण होईपर्यंत देखील स्कॉलरशिप मिळते. याअंतर्गत महाराष्ट्र अकरावी प्रोग्रम, सीबीएसई सिंगल गर्ल चाइल्ड मेरिट स्कॉलरशिप योजना येतात. सीबीएसईकडून मिळणाऱ्या सिंगल गर्ल चाइल्ड मेरिट स्कॉलरशिप योजनेत सहभागी होण्यासाठी पुढील निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. विद्यार्थीनीस दहावी परीक्षेमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ६.२ सीजीपीए ग्रेड असणे गरजेचे आहे. सीबीएसई संबंधित शाळांमध्ये अकरावी आणि बारावीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील फीस १५०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jFtulI
via nmkadda