Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-02T10:44:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 10th result 2021: सीबीएसई दहावीचा रिझल्ट आज नाहीच, बोर्डाकडून आली नवी अपडेट Rojgar News

Advertisement
2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) बारावीचा निकाल ३० जुलैला जाहीर झाला आहे. पण आता सीबीएसई दहावी (CBSE 10th)च्या निकालाची लाखो विद्यार्थी आणि पालक वाट पाहत आहेत. सीबीएसई बोर्ड दहावीच्या निकालाची २ ऑगस्टला घोषणा होणार अशी शक्यता वर्तविली जात होती. पण आज सीबीएसई दहावीच्या निकालाची घोषणा होणार नाही असे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बारावीच्या निकालाची घोषणा केल्यानंतर आता सीबीएसई परीक्षा नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी म्हटले की, आम्ही आजपासून दहावी रिझल्टसाठी काम सुरु करत आहोत. पुढच्या आठवड्यापर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, सन्यम भारद्वाज यांनी कोणती ठराविक तारीख सांगितली नाही. बोर्ड या आठवड्यात म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल आधी २० जुलैला जाहीर केला जाणार होता. पण रिझल्ट स्थगित करण्यात आला. त्यानंतर बोर्डाने दहावी निकालासंदर्भात काही ठोस माहिती दिली नाही. तसेच रिझल्टला उशीर का होतोय? याचे कारणही स्पष्ट केले नाही. करोना काळातून धडा घेत आता या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई बोर्डातर्फे दोन परीक्षा (CBSE Board Exams 2022) घेतल्या जाणार आहेत. सीबीएसईने यासंदर्भात काही दिवसांपुर्वी नोटीफिकेशन जाहीर केले आहे. प्रत्येक भागात ५०-५० टक्के अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. शिकवल्यानंतर त्याची परीक्षा घेतली जाईल. म्हणजे वर्षातून दोन बोर्ड परीक्षा होतील. याशिवाय इंटरनल असेसमेंट देखील वाढवल्या जातील. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये करोना परिस्थिती नियंत्रणात नसेल तर याच परीक्षांच्या आधारे दहावी आणि बारावी बोर्ड २०२२ चा रिझल्ट तयार केला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jeQGqx
via nmkadda