Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-02T11:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NABARD Recruitment 2021: नाबार्ड बँकेत अधिकारी पदाची संधी Rojgar News

Advertisement
प्रा. संजय मोरे नाबार्ड बँकेतील अधिकारी पदाच्या भरती संदर्भात माहिती घेणार आहोत. नॅशनल बँक फॉर अग्रीकल्चर अँड रूरल डेव्हल्पमेंट (NABARD)च्या असिस्टंट मॅनेजर ग्रेड-ए पदांची भरती होणार आहे. ० एकूण रिक्त पदं- १५३ ० रिक्त पदांचा तपशील (अ) असिस्टंट मॅनेजर (RDBS)- १४८ पदं (७ पदं दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव; कॅटेगरी- व्हीआय-१, एचआय-२, एलडी-१, एमडी-३) (१) जनरल- ७४ पदं (अजा-१०, अज-५, इमाव-२२, इडब्ल्यूएस- ६, खुला-३१) पात्रता- पदवी (कोणतीही शाखा) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी, एमबीए/पीजीडीएम किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना पदवी/ पदव्युत्तर पदवीमध्ये गुणांत ५ टक्केची सूट) (२) अॅग्रीकल्चर- १३ पदं (अजा-२, अज-१, इमाव-४, इडब्ल्यूएस-१, खुला-५) (३) अॅग्रीकल्चर इंजिनीअरिंग- ३ पदं (अजा-१, इमाव-१, खुला-१) (४) अॅनिमल हजबंडरी/ केटेरिनरी सायन्स- ४ पदं (अजा-१, इमाव-१, इडब्ल्यूएस-१, खुला-१) (५) फिशरिज- ६ पदं (अजा-१, इमाव-२, खुला-३) (६) फॉरेस्ट्री- २ पदं (अजा-१, खुला-१) (७) प्लांटेशन/ हॉर्टिकल्चर- ६ पदं (अजा-१, इमाव-२, इडब्ल्यूएस-१, खुला-२) (८) लँड डेव्हल्पमेंट (सॉइल सायन्स/अॅग्रीकल्चर)- २ पदं (इमाव-१, खुला-१) (९) वॉटर रिसोर्सेस (हायड्रोलॉजी/जीऑलॉजी)- २ पदं (इमाव-१, खुला-१) (१०) फायनान्स/बँकिंग (बीबीए/बीएमएस)- २१ पदं (अजा-३, अज-१, इमाव-६, इडब्ल्यूएस-३, खुला-८) (११) कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी- १५ पदं (अजा-३, इमाव-४, इडब्ल्यूएस-२, खुला-६) पात्रता- पद क्र. २ ते ११ साठी संबंधित विषयातील पदवी किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर पदवी किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना पदवी/ पदव्युत्तर पदवीमध्ये गुणांत ५ टक्के सूट) (ब) असिस्टंट मॅनेजर (राजभाषा)- ५ पदं (अजा-१, अज-१, इडब्ल्यूएस-१, खुला-२) (१ पद दिव्यांग कॅटेगरी एलडीसाठी राखीव) पात्रता- हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवी (इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून) किमान सरासरी ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण आणि किमान एक वर्ष कालावधीचा हिंदीतून इंग्रजी/इंग्रजीमधून हिंदी ट्रान्सलेशनमधील पीजी डिप्लोमा किंवा एमए (हिंदी) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (पदवी स्तरावर किमान दोन वर्षं इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा) किंवा एमए (इंग्रजी) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (पदवी स्तरावर किमान दोन वर्षं हिंदी विषय अभ्यासलेला असावा) (अजा/ अज/ दिव्यांग उमेदवारांना गुणांत ५ टक्के सूट) उमेदवारांना इंग्रजीमधून हिंदी आणि हिंदीतून इंग्रजीमध्ये भाषांतर करता येणं अनिवार्य आहे. ० वयोमर्यादा- १ जुलै २०२१ रोजी २१ ते ३० वर्षं. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव-३ वर्षं, अजा/अज-५ वर्षं, दिव्यांग-१०/१३/१५ वर्षं) ० निवड पद्धीती निवडीचे तीन टप्पे आहेत. त्याची माहिती पुढीलप्रमाणे... (अ) प्रीलिमिनरी एक्झामिनेशन- सर्व पदांसाठी टेस्ट ऑफ रिझनिंग-२० प्रश्न, इंग्रजी भाषा-३० प्रश्न, कम्प्युटर नॉलेज-२० प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड-२० प्रश्न, डिसिजन मेकिंग-१० प्रश्न, जनरल अवेअरनेस-२० प्रश्न, इकॉनॉमिकल अँड सोशिऑलॉजीकल इश्युज-४० प्रश्न, अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हल्पमेंट-४० प्रश्न, एकूण-२०० प्रश्न, २०० गुण, वेळ-१२० मिनिटं जनरल अवेअरनेस, इको अँड सोशल इश्यूज व अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हल्पमेंट या तीन विषयांवरील (१०० गुण) गुणवत्तेनुसार उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील. (इतर विषय फक्त पात्रता स्वरूपाचे असतील.) (ब) पदनिहाय ऑनलाइन मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह (३० प्रश्न, ५० गुण) आणि डिस्क्रीप्टिव्ह (१५० गुण) स्वरूपाची असेल. (क) मुलाखत- ५० गुणांसाठी ऑब्जेक्टिव्ह पेपरमध्ये चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमधील एकत्रित गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. ० प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग-अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांसाठी बँक विनामूल्य प्री रिक्रूटमेंट ट्रेनिंग आयोजित करणार आहे. त्याकरिता उमेदवारांनी Chief General Manager, NABARD यांना निवडलेल्या केंद्राच्या पत्त्यावर ९ ऑगस्ट २०२१ पूर्वी पोहोचेल असा अर्ज पाठवावा. ऑनलाइन अर्ज www.nabard.org या संकेतस्थळावर ७ ऑगस्ट, २०२१ पर्यंत करावेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fo4pu5
via nmkadda