HSC Result 2021: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण Rojgar News

HSC Result 2021: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण Rojgar News

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९९.६३ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एकूण ८.५७ टक्क्यांनी वाढला आहे. कोविड-१९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बारावीचे अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख १४ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दृष्टीक्षेपात निकाल - परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १३,१९७५४ एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - १३,१४,९६५ एकूण निकाल - ९९.६३ टक्के निकालाची वैशिष्ट्ये - सर्वाधिक निकाल कोकण विभाग - ९९.८१ टक्के सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभाग - ९९.३४ टक्के व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ९८.८० टक्के शाखानिहाय निकाल - विज्ञान शाखा - ९९.४५ टक्के वाणिज्य शाखा - ९९.९१ टक्के कला शाखा - ९९.८३ टक्के विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पुढीलपैकी कोणत्याही लिंकवर सायंकाळी ४ वाजल्यानंतर निकाल पाहता येणार आहे -


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37fI65g
via nmkadda

0 Response to "HSC Result 2021: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel