Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट १२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-12T14:44:01Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU TEE June 2021: इग्नूने जून टीईई विद्यार्थ्यांना दिली असाइनमेंटसाठी मुदतवाढ Rojgar News

Advertisement
IGNOU TEE June 2021: च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, इग्नू (Indira Gandhi National Open University, IGNOU) ने जून टीईई २०२० के लिए प्रोजेक्ट सबमिशन, असाइन्मेंट सब्मिशन, एग्जाम फोर्म, प्रोजेक्ट, इंटर्नशिप, फील्ड जर्नलसाठी मुदतवाढ दिली आहे. यानुसार, आता स्टूडंट्स इंटर्नशिप रिपोर्ट सह अन्य सर्व डॉक्युमेंट्स ३१ ऑगस्ट पर्यंत असाइनमेंट जमा करायचे आहेत. यासंबंधी अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना इग्नूच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन लॉगइन करावे लागेल. अनेक विद्यार्थ्यांना आपल्या असाइनमेंट वेळेत जमा करता आल्या नव्हत्या, म्हणून इग्नूने जून टीईई जून प्रोजेक्ट जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. हेही ध्यानात घ्यायला हवे की परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले फील्ड वर्क आणि असाइनमेंट वेळेत जमा करायचे आहे. त्यामुळे इग्नूने विद्यार्थ्यांना आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला. इग्नू टीईई जून २०२१ च्या परीक्षा ३ ऑगस्ट २०२१ रोजी सुरू झाल्या आणि ९ सप्टेंबर २०२१ रोजी संपणार आहेत. परीक्षा दोन सत्रात होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांना डिसेंबर २०२१ मध्ये पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येईल. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षासाठी इग्नू टर्म एंड परीक्षा बॅकलॉगसह आयोजित केली जात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CHPpkU
via nmkadda