Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-08-07T09:46:16Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

NEET PG 2021: नोंदणी आणि दुरुस्ती विंडो १६ ऑगस्टपासून Rojgar News

Advertisement
2021: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE)ने NEET PG 2021 अर्ज प्रक्रियेसंबंधी एक महत्वपूर्ण सूचना जारी केली आहे. बोर्ड १६ ऑगस्ट २०२१ पासून नोंदणी आणि दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार आहे. जे उमेदवार परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात, ते एनबीईच्या आधिकारिक साइट nbe.edu.in च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी रजिस्ट्रेशन आणि करेक्शन विंडो २० ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. अधिकृत सूचनेनुसार, जे उमेदवार १ जुलै २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ दरम्यान आपली इंटर्नशीप पूर्ण करत आहेत आणि अन्य सर्व पात्रता निकषात बसत आहेत ते या उघडलेल्या विंडोच्या माध्यमातून NEET-PG 2021 साठी अर्ज करू शकतात. PG 2021 परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार एडिट विंडोचा उपयोग करत आपली श्रेणी किंवा EWS स्थिती बदलू शकतात. या दुरुस्ती प्रक्रियेच्या वेळी अर्जात आधी दिलेल्या माहितीत बदल करण्याची परवानगी नसेल. आरक्षण प्रणालीत झालेल्या नव्या बदलांच्या पार्श्वभूमीवर अर्जात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी NEET-PG उमेदवारांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही विंडो ओपन करण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Cqf95a
via nmkadda