Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-08-07T11:44:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Rail India Recruitment 2021: रेल इंडियाच्या विविध विभागांमध्ये ९६ जागांची भरती Rojgar News

Advertisement
Rail India : अंतर्गत राइट्स लिमिटेड या सरकारी कंपनीत तांत्रिक आणि आर्थिक सेवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या अंतर्गत इंजिनीअर आणि ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी पदाच्या एकूण ९६ जागा भरल्या जाणार आहेत. प्रत्येक पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि पगार हा वेगळा असणार आहे. रेल इंडियातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इंजिनीअर सिविलच्या एकूण २५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराकडे सीविल इंजिनीअरिंगमध्ये बीई/बीटेक/बीएससीची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच याचा कालावधी हा २ वर्षांचा असेल. या पदासाठी ४० हजार ते १ लाख ४० हजारपर्यंत पगार देण्यात येईल. इंजिनीअर मॅकेनिकलची १५ पदं भरली जाणार आहेत. त्यासाठी उमेदवाराकडे मॅकेनिकलमध्ये बीई/बीटेक/बीएससीची पदवी असणे गरजेचे आहे. हा दोन वर्षांचा कालावधी असून यासाठी ४० हजार ते १ लाख ४० हजारपर्यंत पगार देण्यात येईल. इंजिनीअर इलेक्ट्रीकलची एकूण ८ रिक्त पदं भरली जाणार आहेत. यासाठी इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंगमध्ये बीई/बीटेक/बीएससीची पदवी असणे गरजेचे असून याचा कालावधी देखील २ वर्षांचा आहे. यासाठी उमेदवाराला ४० हजार ते १ लाखापर्यंत पगार मिळेल. ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (सिविल इंजिनीअरिंग) पदाच्या २५ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी सिविल इंजिनीअरिंगमध्ये बीई/बीटेक/बीएससीची पदवी असणे गरजेचे आहे. ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (मॅकेनिकल) पदाच्या १५ जागा रिक्त असून यासाठी मॅकेनिकलमध्ये बीई/बीटेक/बीएससीची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच प्रोडक्शन इंजिनीअरिंग, इंडस्ट्रीयल इंजिनीअरिंग आणि ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग असणे गरजेचे आहे. ग्रॅज्युएट इंजिनीअर ट्रेनी (इलेक्ट्रीकल) पदासाठी इलेक्ट्रीकलमध्ये बीई/बीटेक/बीएससीची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग हा पर्याय असू शकतो. यासाठी उमेदवाराला अधिकृत वेबसाइट http://www.rites.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. २५ ऑगस्ट ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज कसा पाठवायचा याची संपूर्ण माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. बातमीखालील लिंकवर जाऊन तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37rmd3m
via nmkadda