Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-02T05:43:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

करिअरचे नवे दालन; पुणे विद्यापीठात शिका ड्रोन तंत्रज्ञान Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे तंत्रज्ञानातील महत्त्वाची क्रांती मानले जाणारे ड्रोन तंत्रज्ञान () विद्यार्थ्यांना आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात () शिकण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठात लवकरच याबाबतचे पदवी; तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून ड्रोनचा व्यावसायिकदृष्टीने वापर करणाऱ्यांनाही तंत्रज्ञानाचे बारकावे शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. देशात आणि जगात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी यांसोबतच विविध क्षेत्रातील कामांसाठी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा आणि लष्कराकडूनही ड्रोनचा वापर होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचे तंत्रशुद्ध शिक्षण देणाऱ्या संस्था फारच कमी आहेत. बहुतांश विद्यापीठांमध्ये अजूनही ही सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचे शिक्षण घेण्याची संधी मिळावी आणि त्यातून रोजगाराचे नवे मार्ग उपलब्ध व्हावेत, या अनुषंगाने विद्यापीठाने 'फोरफोर्सेस एअरो प्रॉडक्ट इंडिया लिमिटेड' या कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार विद्यापीठात दोन प्रमाणपत्र; तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. या करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस. उमराणी, नवसंशोधन नवोपक्रम आणि साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, 'फोरफोर्सेस'चे पदाधिकारीही ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल आणि त्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कमी शुल्कात कसे शिकता येईल, याबाबत विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या वेबसाइटवर लवकर उपलब्ध होईल. ड्रोन अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये - 'फोरफोर्सेस' कंपनीकडून तज्ज्ञांचे मार्गदर्शन. - विद्यार्थ्यांना थेअरी अभ्यासक्रमाबरोबर प्रात्यक्षिकाचीही संधी. - विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळण्यासाठी मदत. - टाटा अॅडव्हान्स सिस्टीम लिमिटेड, भारत फोर्ज, महिंद्र डिफेन्स सिस्टीम लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी नव्याने सुरू झालेले अभ्यासक्रम - इंट्रोडक्शन टू (कालावधी - २ आठवडे) - अॅडव्हान्स कोर्स ऑन ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी - १२ आठवडे) - ड्रोन पायलट ट्रेनिंग कोर्स (एक ते दोन आठवडे) पदवी अभ्यासक्रम - बॅचलर ऑफ ऑटोनॉमस व्हेइकल (कालावधी - तीन वर्षे) पदव्युत्तर पदवी - मास्टर ऑफ ऑटोनॉमस व्हेइकल (कालावधी - दोन वर्षे)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zZD3lT
via nmkadda