Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ११, २०२१ WIB
Last Updated 2021-08-11T10:43:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून SOP जाहीर, जाणून घ्या... Rojgar News

Advertisement
Maharashtra School Reopen: करोनाच्या केसेस कमी झाल्यानंतर आता अनेक राज्यांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १७ ऑगस्टपासून सुरु (Schools To Reopen In Cities In Maharashtra) करण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण विभागातर्फे यासंदर्भात SOP जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली. १५ जुलैला राज्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या. ज्या गावांमध्ये मागच्या एका महिन्यापासून करोना केसेस नाहीत अशा ठिकाणी वर्ग सुरु झाले. यासाठी राज्य सरकारने निर्देश आखून दिले आहेत. शहरी भागात समिती घेणार निर्णय शहरी भागांमध्ये महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेईल. ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बनवली गेलेली समिती कोणत्या भागात शाळा सुरु होणार? याचा निर्णय घेईल. मुंबई आणि ठाण्याबाबत निर्णय नाही मुंबई आणि ठाण्याबाबतचा निर्णय सध्या राखून ठेवण्यात आला आहे. इथल्या शाळा सुरु करायच्या की नाही? याबाबतचा निर्णय तिथले महापालिका आयुक्त घेतील. विद्यार्थी संख्या वाढली तर शाळा सुरु झाल्यानंतर नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. विशेषत: ज्या शाळेमध्ये जास्त मुलं असतील त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेळेत बोलावले जाईल. सोशल डिस्टन्सिंग आणि करोना प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे राहील. एका बॅंचवर एक विद्यार्थी वर्गामध्ये एका बॅंचवर एक विद्यार्थी बसू शकेल. प्रत्येक बॅंचमध्ये ६ फूटाचे अंतर असेल. मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. पालकांनी शाळेत येऊन गर्दी करु नका पालकांनी शाळेत येऊन गर्दी करु नये असे एसओपीमध्ये म्हटले आहे. शाळेमध्ये एक जरी विद्यार्थी करोना पॉझिटीव्ह सापडला तर शाळा बंद करावी लागेल आणि पूर्ण शाळा सॅनिटाइझ करावी लागेल. शिक्षकांना शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था शाळेमध्ये शिक्षकांना राहण्याची व्यवस्था शक्य असेल करावी. सार्वजनिक वाहतूकीचा कमीत कमी वापर हे अधिक सुरक्षित असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fQ0M0s
via nmkadda