AISSEE 2022: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात Rojgar News

AISSEE 2022: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात Rojgar News

AISSEE 2022: अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेसाठी (AISSEE 2022) अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी () ने ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय 2022 (AISSEE) साठी अर्ज जारी केले आहेत. इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये प्रवेशासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थी अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२१ (संध्याकाळी ५ पर्यंत) आहे. उमेदवार साठी केवळ aissee.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज कसा भरायचा? तुमचा युनिक आयडी आणि मोबाईल नंबर वापरून https://ift.tt/37jXO0B या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन नोंदणीसाठी अर्ज करा. त्यानंतर ऑनलाइन अर्ज भरा आणि सिस्टम जनरेटेड अर्ज क्रमांक नोंदवा. आता कागदपत्रे अपलोड करा. यानंतर उमेदवाराच्या छायाचित्रे जेपीजी/जेपीईजी स्वरूपात (फाइल आकार: १० केबी - २०० केबी) असावी. तसेच JPG/JPEG स्वरूपात उमेदवाराची स्वाक्षरी (फाइल आकार: ४kb - ३०kb)आवश्यक आहे. आता उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा द्यावा. (फाइल आकार १० KB-५० KB) JPG/JPEG स्वरूपात. जन्मतारखेचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात/समुदाय/श्रेणी प्रमाणपत्र, सेवेचे प्रमाणपत्र (संरक्षण श्रेणी-सेवेसाठी) आणि माजी सैनिकांसाठी PPO लागू असेल. त्यानंतर SBI, ICICI बँक, पेटीएम पेमेंट गेटवे वापरून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI द्वारे शुल्क भरा आणि भरलेल्या शुल्कासह संपूर्ण फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा. AISSEE 2022 परीक्षा ९ जानेवारी, २०२२ रोजी आयोजित केली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ६ वी आणि ९ वीच्या प्रवेशासाठी देशभरातील १७६ शहरांमध्ये NTA पेपर पेन मोडमध्ये आयोजित केली जाईल. सैनिक शाळांमध्ये ६ वी आणि ९ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) मधील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित असतील. अंतिम निवड शाळानिहाय, वर्गवार, श्रेणीनिहाय रँक, प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीत, सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंजूर केलेली मेडिकल फिटनेस आणि मूळ कागदपत्रांची पडताळणी यावर आधारित आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AQh8yz
via nmkadda

0 Response to "AISSEE 2022: सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या अर्जप्रक्रियेला सुरुवात Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel