CBSE Result: सीबीएसई बोर्डाचा दहावी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

CBSE Result: सीबीएसई बोर्डाचा दहावी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News

Class 10: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Central Board of Secondary Education, CBSE) घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसई बोर्डाने ३० सप्टेंबर रोजी सीबीएसई इयत्ता दहावीच्या कंपार्टमेंट परीक्षांचे निकाल अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in आणि वर जारी केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे, ते वेबसाइटवर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. यावर्षी एकूण १७,६३६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. दहावी निकालाची उत्तीर्णता ९९.०४ टक्के आहे. मागील वर्षी एकूण ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दहावी कंपार्टमेंट परीक्षेच्या निकालात एकूण ७ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले की दहावी २०२१ निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांवर आधारित तयार करण्यात आला आहे. यावर्षीच्या सुरुवातीलच म्हणजे मार्चच्या अखेरच्या आठवड्यात कोविड १९ संक्रमणाची दुसरी लाट आली होती, परिणामी करोना संसर्गग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली होती. परिणामी, बोर्डाने दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थीनींची उत्तीर्णतची टक्केवारी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ०.३५ टक्क्यांनी अधिक आहे.५७,८२४ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत, तर २,००,९६२ विद्यार्थ्यांनी ९० ते ९५ टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळवले आहेत. या व्यतिरिक्त दिल्ली क्षेत्राचा सीबीएसई दहावीचा निकाल पूर्वीपेक्षा वाढला आहे. यंदा दिल्ली क्षेत्रात ९८.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी १२ टक्क्यांनी अधिक आहे. तिरुवनंतपुरम क्षेत्राचा निकाल ९९.९९ टक्के आहे. त्यानंतर बेंगळुरू (९९.९६ टक्के) आणि चेन्नई (९९.९४ टक्के) यांचा क्रमांक आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3upiOfQ
via nmkadda

0 Response to "CBSE Result: सीबीएसई बोर्डाचा दहावी कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel