Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-29T14:43:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Government Job 2021: IBPS तर्फे विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील Rojgar News

Advertisement
IBPS Recruitment 2021: बँकिंग कर्मचारी निवड संस्थेतर्फे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. IBPS च्या या भरतीअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, फॅकल्टी रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट, हिंदी ऑफिसर, आयटी इंजिनीअर (डेटा सेंटर), आयटी डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर (फ्रंटएंड, बॅकएंड) या पदांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट देऊन तपशील तपासू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. १४ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या कालावधीतनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. यामध्ये काही त्रुटी असल्यास अर्ज बाद करण्यात येईल. महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख- १ ऑक्टोबर २०२१ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १४ ऑक्टोबर २०२१ परीक्षेची तारीख - ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२१ इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, विविध पदांसाठी उमेदवारांचे वय २१ ते ४० वर्षांदरम्यान असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार यामध्ये शिथिलता दिली जाईल. उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील पदवी तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून यूजी, पीजी, पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. योग्य पात्रता तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशन पाहू शकतात. यासोबतच उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आरोग्य विज्ञान संस्थेत भरती अनुवादित आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था ( ) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव, वयोमर्यादा याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ट्रान्स्लेट हेल्थ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी संस्थेच्या प्रशासकीय विभागाअंतर्गत एकूण ७ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये प्रयोगशाळा व्यवस्थापक (Lab Manger), कनिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ (Juinior Research Scientist), वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant), तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant), क्षेत्र कार्यकर्ता (Field Worker) आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. प्रयोगशाळा व्यवस्थापक (Lab Manger) या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून लाइफ सायन्स, बायोटेक्नोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रो बायोलॉजी विषयात पीएचडी असणे गरजेचे आहे. संबधित क्षेत्रातील पोस्ट पीचएडीचा ३ वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी ४५ वर्षे वयोमर्यादा असून १ लाखपर्यंत पगार दिला जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39QgYLw
via nmkadda