Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २७, २०२१ WIB
Last Updated 2021-09-27T12:43:27Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

ICMAI CMA 2021: जून सत्राची इंटर आणि फायनल परीक्षा स्थगित Rojgar News

Advertisement
CMA 2021: द इंस्टीट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडिया (ICMAI) संस्थेने जून २०२१ सत्रासाठी ऑक्टोबरमध्ये होणारी सीएमए इंटर आणि अंतिम परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेकडून यासंदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, सीएमए इंटर आणि अंतिम परीक्षा काही कारणांमुळे स्थगित करण्यात आल्या आहेत.सोबतच आईसीएमएआयने दोन्ही कोर्सेसच्या परीक्षा आता डिसेंबर २०२१ सत्राच्या परीक्षांसोबत घेण्याची घोषणा केली आहे. आईसीएमएआय सीएमए इंटर आणि फाइनल जून सत्र परीक्षा २१ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत घेतली जाणार होती. पुन्हा फॉर्म भरण्याची गरज नाही जून २०२१ सत्राची स्थगित करण्यात आलेल्या सीएमए इंटर आणि फायनल परीक्षेच्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे दिलासा देण्यात आला आहे. डिसेंबर सत्राच्या परीक्षा देताना त्यांना पुन्हा परीक्षा फॉर्म भरण्याची गरज नसेल. त्यांचा जून परीक्षेचा फॉर्म नव्या परीक्षा सत्रासाठी वैध राहणार आहे. परीक्षा केंद्रात बदल करु शकता आयसीएमएआय जून २०२१ सत्रासाठी परीक्षा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी निवडलेल्या परीक्षा केंद्रात बदल करायचा असल्यास करु शकणार आहेत. त्यासोबतच विद्यार्थी आपल्या परीक्षा ग्रुपमध्ये देखील बदल करु शकतात. यासाठी त्यांना संबंधित परीक्षा शुल्क भरावे लागेल. आयसीएमएआयने जाहीर केलेल्या नोटीसमध्ये यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकेल. CMA Admit Card : असे करा डाऊनलोड CMA फाउंडेशन प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरील एक्झाम टॅबवर जा. प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. नवीन पेजवर जाऊन कोर्स (फाउंडेशन) निवडावा उमेदवारांनी त्यांचा नोंदणी क्रमांक सबमिट करावा. उमेदवार आपले प्रवेशपत्र डाउनलोड आणि प्रिंट करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यावर दिलेले सर्व तपशील काळजीपूर्वक वाचावेत. कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळल्यास शक्य तितक्या लवकर ICMAI ला कळवावे. उमेदवार संस्थेचे हेल्प डेस्क क्रमांक ०३३-४०३६४७७७, २२५२१०३१, ०३३-२२५२१६०२/ १६१९/७३७३/७१४३/२२०४ वर फोन करु शकता. किंवा ईमेल आयडी exam.helpdesk@icmai.in वर मेल करून मदत मिळवू शकतात. सीएमए फाउंडेशनची परीक्षा आयसीएमएआयद्वारे ऑनलाईन होम-प्रोक्टेड मोडमध्ये घेतली जाणार आहे जी मोबाईल/लॅपटॉप/डेस्कटॉप/टॅब वापरून दिली जाऊ शकते


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m1qPnp
via nmkadda